मुंबई: मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि बघिनी आणि मातांनो अशी हाक देता आली, या वाक्यांनी उद्धव ठाकरेंनी संबोधनाची सुरुवात केली. आज दोन मेळावे आहेत. एक आरएसएसचा आणि दुसरा आपला आपले विचार एक आहेत पण धारा वेगळ्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलं होतं आणि त्या जबाबदारीमुळं मी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. बाळासाहेब ठाकरेंना शिवसैनिक मुख्यमंत्री करणार असल्याचं वचन दिलं होतं. विशिष्ट परिस्थितीत मी जबाबदारी स्वीकारली. तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करुन दाखवणार असल्याचं वचन बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं. ते वचन पूर्ण करणारचं आहे. शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर मी राजकारणातून बाजूला झालो असतो, उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपनं दिलेला शब्द पाळला असता आणि शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर मी राजकारणातून बाजूला झालो असतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये
आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत अशताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हावला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.
ठाकरे कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना तिथल्या तिथं ठेचून काढू असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझा वाडा चिरेबंदी आहे. टकरा मारा, काही करा आम्ही संकट परतवून लावू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही. कुणी अंगावर आलं तर सोडत नाही. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागं लपायचं, असं चालणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आज दोन मेळावे आहेत. एक आरएसएसचा आणि दुसरा आपला आपले विचार एक आहेत पण धारा वेगळ्या आहेत. तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करुन दाखवणार असल्याचं वचन बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं. ते वचन पूर्ण करणारचं आहे. शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर मी राजकारणातून बाजूला झालो असतो, उद्धव ठाकरे म्हणाले.
जे लोक म्हणतात की मी पुन्हा येईन, ते कधी येतील मला माहित नाही. सत्तेऐवजी लोक महत्वाचे आहेत, मी तुमच्या कुटुंबाचा भाग आहे, मी टिप्पणी करत नाही , मी तुमच्या साठी बोलतो, अनेक लोक ठाकरे कुटुंबाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप करणारा कोणीही जन्माला आला नाही. माझे भाषण संपते कधी आणि यांना चिरकायला मिळते कधी याची वाट बघत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री राहिला असता. विचार एक होते म्हणून भाजपशी युती केली होती. माझ्या जन्म पुन्हा महाराष्ट्र झाला पाहिजे व मला मुख्यमंत्री असल्याचा भास होऊन नये. अहम पणा डोक्यात जाऊ देऊ नको. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही अंगात ताकद असेल तर उडी, सीबीआय यांना यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करता आहात.
हे पद शिवसेना पक्षप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना दिले शब्द पाळतो जबाबदारी पार पाडतोय.सकाळी RSSमेळावा झाला,मोहन जी आपल्यावर ठिका करत नाही. देश हा माझा धर्म आम्ही मानतो. जर, तुमच्या विचारधारेपेक्षा कोण वेगळा आहे, सत्तेचे व्यसन चालू आहे, ते एका प्रकारे औषधाप्रमाणे आहे, सत्तेतून काढून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत. छापे मारणे त्यांच्या काट्यासारखे काटे काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज दोन मेळावे असतात. एक आपला आणि दुसरा आरएसएसचा. आपले विचार एक आहेत. पण धारा वेगळ्या असू शकतात. विचार एक होत्या, आहेत म्हणूनच भाजपसोबत युती केली होती. ज्यांना अजूनही वाटतं ते मुख्यमंत्री राहिले असते, कदाचित राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्हीसुद्धा आज नाहीतर उद्या मुख्यमंत्री राहिले असता. पण नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन तोडलंत. मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं. मी केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवेसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेल, खरंतर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. पण ते वचन मी पूर्ण करुन दाखवेलंच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. कदाचित दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं शिवसैनिक मुख्यमंत्री केली असती तर मी या राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. हे क्षेत्र माझं नाही, अशी माझ्यावर टीका होते. हो हे माझं क्षेत्र नाही. मी एक पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आहे. आणि पाय रोवून ठाम पणाने उभा राहिलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या जबाबदारीने मी उभा राहिलेलो आहे.
हे काही थोडांत नाही की, मैं तो फकीर हुँ, झोली पहनके, ये झोलीबीली असे कर्मदरिद्री आमचे विचार नाहीयत. हे विचार आमचे नाहीत. सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदूत्व म्हणजे काय? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका. पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर या मेळाव्यांची थेरं करायची तरी कशाला?
राजनाथ सिंह कोण म्हणतात की तुम्ही कधी सावरकर आणि गांधीजींना भेटलात का? 1992-1993 येथे दंगल झाली तेव्हा येथे कोण होते. बाबरी मशिदीच्या वेळी सगळे गप्प होते, त्यांची छाती थरथरत होती, शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली आणि अभिमानाने सांगितले आम्ही हिंदू आहोत. आज तोच शिवसैनिक तुमचे शब्द ऐकत नाही (पालखी घेऊन जात नाही) त्यामुळे भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला जातोय, असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले.
मला ठाण्याच्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, नवरात्रीच्या वेळी येथे गरबा होतात, गरबाला परवानगी नव्हती, सर्व शिवसैनिकांनी रक्तदान केले, मला अभिमान आहे, मोहन जी, मला सांगा, आम्ही हे रक्त फक्त एकाला विचारानं दान केलं.
महाराष्ट्राकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणं, की इथे काही घडले तर असे म्हटले जाते की लोकशाहीचा खून इथेच झाला. उत्तर प्रदेशात काय चालले आहे? 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, महाराष्ट्राच्या पोलिसांनी दहशतवाद्यांना ठार मारले. तुम्हाला काय वाटते तुम्ही त्यांना माफिया काय बोलवत आहात. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री प्रियंका, राहुल, छत्तीसगड, तिथ काय चालले होते ते थांबवले.
आर्यनचे नाव न घेता सांगितले की मी तरुणांबद्दल बोलत आहे, युवा शक्तीला कामाची गरज आहे, पण ते या नोकऱ्या कोठे आहेत, आम्ही महाराष्ट्रात रोजगार आणि रोजगाराच्या संधी देत आहोत प्रत्येक प्रयत्न केला जात आहे इथे महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या भवन मराठी भाषा भवन बांधण्यासाठी लवकर काम करणे, धारावीतील लोकांचे पुनर्वसन करणे, परंतु आर्थिक केंद्र देखील उभारणे, मुंबईत आर्मी तुम्ही एक संग्रहालय बांधत आहात ज्यामध्ये लष्कर तुमचे रक्षण करत आहे, कोणत्या परिस्थितीत ते कोणत्या प्रकारच्या बॉम्बचा सामना करत आहेत, ते किती कर्तव्य बजावत आहेत, हे तुम्ही जाणवू शकता.
इतर बातम्या:
Dussehra 2021 Live Updates | आपला आवाज दाबणारा जन्माला येऊच शकत नाही : उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी?; संजय राऊत म्हणाले…