मुंबईः महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ताकारणात एक महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळातच राजीनामा देणार असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांशी त्यांनी याविषयावर चर्चा केल्याचंही सांगण्यात येत आहे. महाविकस आघाडी सरकार अल्पमतात येण्याची दाट शक्यता असल्याने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणारी आजची कॅबिनेट बैठक या राज्यमंत्रीमंडळाची शेवटची बैठक असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी अचानक आज संध्याकाळी पाच वाजता ही बैठक बोलावली असून या बैठकीत ते महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंबंधी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याचीही माहिती हाती आली आहे. आज दुपारीच कॅबिनेटची बैठक होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. दुपारी अडीच वाजता होणारी बैठक पाच वाजता घेण्याचं जाहीर कऱण्यात आलं. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार, सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी पूर्णपणे कोलमडून पडणार असल्याची स्थिती निर्माण झाल्याने या सरकारमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्याच्या प्लॅनवर उद्धव ठाकरे आणि इतर घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी पूर्णपणे कोलमडून पडणार असल्याची स्थिती निर्माण झाल्याने या सरकारमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्याच्या प्लॅनवर उद्धव ठाकरे आणि इतर घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत मविआ सरकारसंबंधीचा महत्त्वाचा निर्णय उद्धव ठाकरे घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मविआमधील बहुतांश कॅबिनेट मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. या कठीण काळात त्यांना साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे ते आभार मानू शकतात.