मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. अशावेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका मागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि काँग्रेस आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) या दोघांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत अशी माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2022
यामुळं सर्वच विद्यार्थ्यांची विशेषतः विद्यार्थीनींची कुचंबना होणार नाही शिवाय स्वच्छतागृहांअभावी सावित्रीमाईच्या कोणत्याही लेकीचं शिक्षणही बंद पडणार नाही. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/ER0H3ayOFB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2022
तर लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धिरज देशमुख यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशमुख यांनी स्वत:च ही माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, असं ट्वीट धिरज देशमुख यांनी केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) January 3, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील सदस्य असलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च त्याबाबत माहिती दिली होती.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
इतर बातम्या :