मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वेगानं वाढत आहे. अशावेळी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर 15 ते 19 वयोगटातील तरुणांचे लसीकरण (Corona vaccination) आणि आरोग्य कर्मचारी, वयोवृद्धांना बुस्टर डोसमुळे केंद्र सरकारनं कोव्हॅक्सिन (covaxine) आणि कोविशिल्ड (Covishield) लसीचा वाढीव पुरवठा करण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिलीय. तर राज्यात कोरोना लसीचा पुरेसा साठा शिल्लक असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीआयबीच्या वृत्ताचा दाखला देत केलाय.
‘किमान महिनाभर पुरेल इतका लससाठा असूनही महाराष्ट्राला अजून लस हवी आणि ती मिळत नाही, असा कांगावा मविआने सुरू केलाय. PIBने याबाबत सत्य स्पष्ट करणारी माहिती दिली त्यानुसार महाराष्ट्राकडे कोव्हिशिल्ड लसीच्या सुमारे सव्वा कोटी व कोव्हॅक्सिनच्या 30 लाखांहून अधिक मात्रा आहेत. 15 -18 आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरा डोस यासाठी कोव्हॅक्सिन 2.94 लाख तर कोव्हिशील्ड रोज 3.57 लाखाचे आकडे कोविन डॅशबोर्डवरही दिसताहेत. म्हणजेच महिनाभर पुरेल इतका लससाठा महाराष्ट्राकडे असल्याचं स्पष्ट आहे. आजही (14 जाने) महाराष्ट्राला 6,35 लाख कोव्हॅक्सिन देण्यात आल्यात. महिनाभर पुरेल इतका लससाठा असूनही आणखी लस मागणं आणि ती मिळत नाही म्हणून गळे काढण्यातून साध्य काय होईल? असं राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची बदनामी होतेय की, स्वतःचं हसं हे मविआनं एकदा तपासून घ्यावं’, असा टोला पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावलाय.
१५ -१८ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरा डोस यासाठी कोव्हॅक्सिन २.९४ लाख तर कोव्हिशील्ड रोज ३.५७ लाखाचे आकडे कोविन डॅशबोर्डवरही दिसताहेत. म्हणजेच महिनाभर पुरेल इतका लससाठा महाराष्ट्राकडे असल्याचं स्पष्ट आहे. आजही (१४ जाने) महाराष्ट्राला ६.३५ लाख कोव्हॅक्सिन देण्यात आल्यात.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 14, 2022
महिनाभर पुरेल इतका लससाठा असूनही आणखी लस मागणं आणि ती मिळत नाही म्हणून गळे काढण्यातून साध्य काय होईल? असं राजकारण करून पंतप्रधान @narendramdiजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची बदनामी होतेय की, स्वतःचं हसं हे मविआनं एकदा तपासून घ्यावं.
जिज्ञासूंसाठी – https://t.co/RTdIvSUel4— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 14, 2022
महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे सांगणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर लसींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे.
याबाबत असे स्पष्ट करण्यात येत आहे की आज उपलब्ध झालेल्या अहवालानुसार(14 जानेवारी 2022) महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत. त्याबरोबरच आज लसीच्या 6.35 लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत. कोविनवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार, 15 ते 17 वयोगटातील लाभार्थींना देण्यासाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर 2.94 लाख मात्रा आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थींना कोवॅक्सिन या लसीच्या मात्रा देण्यासाठी पुढील दहा दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे.
त्याशिवाय राज्याकडे कोविशील्ड या लसीच्या वापर न झालेल्या आणि शिल्लक असलेल्या सुमारे 1.24 कोटी मात्रा आहेत. त्यांचा दिवसाला सरासरी 3.57 लाख मात्रांचा वापर विचारात घेतला तर हा साठा लाभार्थींना लसी देण्यासाठी 30 दिवसांपेक्षाही जास्त दिवस पुरेसा ठरू शकतो.
त्यामुळेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही आणि महाराष्ट्रात शिल्लक असलेल्या साठ्याचे आणि वापर न झालेल्या कोविड लसींच्या मात्रांचे वास्तविक चित्र प्रदर्शित करत नाही.
महाराष्ट्रात कोवॅक्सिन या लसीच्या वापर न झालेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा शिल्लक आहेत
त्याशिवाय आज 6.35 लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत@MoHFW_INDIA @MahaDGIPR @mybmcHealthDept@MahaHealthIEChttps://t.co/caWKFXTs21
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) January 14, 2022
लसीकरणाबाबत जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरु आहे. त्यात आपण कोव्हॅक्सिन लसीचे 40 लाख डोस आणि कोविशिल्ड लसीचे 50 लाथ डोस मागितले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केल्याचं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर काही लोकांचा गैरसमजातून लसीकरणाला विरोध असतो. त्यामुळे केंद्राकडून याबाबत काही नियमावली करता येईल का? अशी विचारणा केल्यांचही टोपे म्हणाले.