मुंबई : “एका तरुण नेत्याच अशा पद्धतीने निधन व्हाव हे अतिशय गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही” असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अभिषेक घोसाळकर यांच्या निधनावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना गंभीर आहे, मात्र “गोळ्या घातल्या त्या मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित फोटो पहायला मिळालेत. वर्षानुवर्ष ते एकत्र काम करत होते. आता कुठल्या विषयावरुन बेबनाव झाला हे महत्त्वाच आहे, त्यांची चौकशी सुरु आहे. पोलीस तपासात वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. योग्यवेळी ती माहिती तुम्हाला दिली जाईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र त्याच राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणण चुकीच आहे. कारण ही हत्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बंदुकांचे लायसन्स असतील, ही लायसन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे? याचा विचार सरकार नक्कीच करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की….
विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, त्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, “हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी, ते राजीनामा मागतील. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना गंभीर आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा मागितला, तर मला आश्चर्य वाटत नाहीय. ही व्यक्तीगत वैमनस्यातून झालेली हत्या आहे. विरोधी पक्ष त्यांचं काम करतोय” असं देवंद्र फडणवीस म्हणाले.