मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागलाय. सचिन वाझेला गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. त्याबाबत अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Ajit Pawar, Jayant Patil, Dilip Walse Patil and Hasan Mushrif are in the running for the post of Home Minister)
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. अशावेळी गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचंही नाव समोर येतंय. तसंच हसन मुश्रीफ हे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळतेय.
After the high court order, Home Minister Anil Deshmukh met Pawar Ji & party leaders & said he doesn’t want to remain in the post. He went to tender his resignation to the CM. Party has requested to the CM to accept his resignation: State Minister & NCP leader Nawab Malik pic.twitter.com/oukzN05833
— ANI (@ANI) April 5, 2021
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
अजित पवार यांचा दांगडा अनुभव, प्रशासनावरील वचक पाहता अजित पवार यांचंही नाव गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे. पण अजित पवार यांच्याकडे अर्थखात्यासारखी मोठी जबाबदारी आहे. अशावेळी त्यांच्याकडील अर्थखातं काढून गृहखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असंही बोललं जात आहे.
दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक क्लिन इमेज राष्ट्रवादी काँग्रेसला गरजेची आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!
हसन मुश्रीफ तातडेन मुंबईकडे रवाना, गृहमंत्रीपदाचा चार्ज जवळपास निश्चित!
Ajit Pawar, Jayant Patil, Dilip Walse Patil and Hasan Mushrif are in the running for the post of Home Minister