मुंबई: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील निवडणुका स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation) पार पडत आहेत. महाराष्ट्रात आज 105 नगर पंचायतीसाठी (Maharashtra Nagar Panchayat Election 2021) मतदान होत आहे. नंगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेसह 15 पंचायत समित्यांची निवडणूक पार पडणार आहे. तर, नगरपालिकेच्या काही जागांवर देखील पोटनिवडणूक होणार आहे.
स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झाल्यानंतर राज्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. राज्य सरकारनं त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. ओबीसी राजकीय आरक्षण निश्चित करण्यात आलेल्या जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. तर, ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करण्यास तीन महिन्यांचा कालावधी देखील देण्यात आलाय. राज्य निवडणूक आयोगानं ओबीसी आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांसाठी नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात मतदान होणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या 43 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 86 जगाांसाठी आज मतदान होतं आहे. ओबीसीच्या 30 जागांवरील निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्यात होणार आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, देवरी, तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी, अर्जनी मोरगाव पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. तर, भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 39 आणि 7 पंचायत समितीच्या 79 जागांसाठी मतदान प्रक्रिया पडत आहे.
राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ #नगरपंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबरला #मतदान तर; २२ डिसेंबरला #मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून #आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी केली.#Election #SVEEP pic.twitter.com/OpUOLImIqD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 24, 2021
महाराष्ट्रातील या नगरपंचायतीसाठी मतदान
शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागांची पोटनिवडणूक देखील होणार आहे. नंगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Nagar Panchayat Election 2021 voting live updates Bhandara Gondia ZP Panchayat Election Sangli Dhule Ahmednagar Municipal Corporation by election news