मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) तोंडावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईसह राज्यातील सर्वच मनपा निवडणुकांना पूर्ण तयारीनिशी सामोरी जाणार आहे. मनसे आध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावेळी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यासुद्धा पदाधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. मानखुर्द-छत्रपती शिवाजीनगर भागात काही दिवसांपूर्वी मनसेमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला होता. त्याच प्रार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांनी मानखुर्द विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. आता ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये शर्मिला ठाकरेंनी खांडेकरांच्या कामाची प्रशंसा सुद्धा केली आहे. पुढील काळात नक्कीच तुमच्या भागात येणार, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शर्मिला ठाकरे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत असल्याचं दिसून आलं आहे.
शर्मिला ठाकरे : कसं चाललंय जगदीश काम, चांगलं चाललंय ना?
जगदिश खांडेकर : वहिनी तुमचा आशीर्वाद…
शर्मिला ठाकरे : एकदम एकदम छान, मी बघते फेसबुकवरती, कधी हे सगळं लाईकपण करते
जगदिश खांडेकर : हो धन्यवाद, तुमच्या एका लाईकमुळे…
शर्मिला ठाकरे : चांगले पक्षप्रवेश चालू आहेत
जगदिश खांडेकर : हो शंभर टक्के, आणि काय करायचं.. साहेबांचा वेळ मिळाला की सगळ्यांना एकदाच घेऊन येणार आहे तिकडे
शर्मिला ठाकरे : हो चालेल
जगदिश खांडेकर : आता कसे छोटे छोटे चालू आहेत ना, प्रत्येक वॉर्डमधून. आता संध्याकाळपासून छोटीशी स्क्रीनसुद्धा करतोय मी साहेबांच्या भाषणाची, ते पण इफेक्टिव्ह राहील
शर्मिला ठाकरे : हो चांगलंय
जगदिश खांडेकर :आपल्याला काय फारशी मेहनत करायला लागत नाही
शर्मिला ठाकरे : रेग्युलर ऑफिसमध्ये पण बसत जा कोण ना कोणतरी
जगदिश खांडेकर : हो हो, आपले आता विभागात साधारणतः तीन ऑफिसचं काम झालेलं आहे, आणि अजून एक-दोन ऑफिसचं काम सुरु आहे. म्हणजे साधारण चार-पाच ऑफिस होतील. आणि एकदा साहेबांनी वेळ दिलीच, तर खूप मोठ्या प्रमाणावर…
शर्मिला ठाकरे : चांगलंय, तुमचं झालं की सांगा, मी वेळ देते
जगदिश खांडेकर :हो तुम्हालाही बोलावणार, आपले आशीर्वाद असेच ठेवा आणि आपल्या अंकाचंही झालंय. आपलं मागच्या महिन्यात बोलणं झालेलं. इलेक्शन आहेत, त्यामुळे थोडे ऑफलाईनही करायला लागतील.
शर्मिला ठाकरे : हो हो
जगदिश खांडेकर : तुमचे आशीर्वाद ठेवा
संबंधित बातम्या :
माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा :उद्धव ठाकरे