मुंबई : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता बघायला मिळतयं. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) धोक्यात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सातत्याने बघायला मिळतंय. त्यामध्येच आता मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांचे एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या ट्विटमध्ये जोरदार टोला मारण्यात आलायं. भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे, असं गजानन काळे यांनी म्हटलंय.
भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही)
हे सुद्धा वाचानाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे ?
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 29, 2022
राज्यातील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतायंत. एकनाथ शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. उद्या सकाळी एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दाखल होती. यादरम्यान गजानन काळे यांचे ट्विट व्हायरल होत आहे, भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे, असे म्हटंले आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे स्पष्ट आहे. कारण शिंदे गटाकडे 51 आमदार असल्याचा दावा स्वत: एकनाथ शिंदे यांनी केलायं. त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीच आहेत. उद्या 11 वाजता फ्लोर टेस्टला सुरुवात होईल, हे विशेष अधिवेशन बहुमत सिद्ध करण्यासाठीच बोलवण्यात आले आहे. 5 वाजेच्या आत फ्लोर टेस्टची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. हे विशेष अधिवेशन कोणत्याही परिस्थितीमध्ये तहकूब केले जाणार नसल्याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली आहे.