Special Report | दोन पत्रांवरुन रणकंदन, राहुल गांधी vs भाजप-शिंदे गट, ठाकरेंवरही निशाणा

| Updated on: Nov 17, 2022 | 11:58 PM

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एका पत्रावरुन महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय.

Special Report | दोन पत्रांवरुन रणकंदन, राहुल गांधी vs भाजप-शिंदे गट, ठाकरेंवरही निशाणा
Follow us on

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एका पत्रावरुन महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींनीच हा मुद्दा उकरुन काढलाय. याला भाजपनं आणि शिंदे गटानं तीव्र आक्षेप घेतलाय. भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही इंदिरा गांधींचं एक पत्र समोर आणून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्रांवरुन वाद पेटलाय. आणि त्याला कारण ठरलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेलं एक वक्तव्य.

राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. सावरकरांच्या विचारांना अपमानित करणारे विचार गाडल्याशिवाय शांत बसणार नाही असं आव्हान फडणवीसांनी दिलं.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींनीही पत्रकार परिषद घेतली. आणि फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधींनी सावरकरांचं पत्र दाखवल्यानंतर आशिष शेलार यांनी इंदिरा गांधींनी लिहिलेलं एक पत्र समोर आणलं. राहुल गांधींच्या वक्तव्यावर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही आक्षेप घेतलाय.

राहुल गांधींनी सावकरांवरुन केलेल्या विधानाचा वाद याआधी अनेकदा उद्भवलाय. 2019 मध्ये संसदेतल्या भाषणात राहुल गांधींच्या विधानावरुन हा वाद सुरु झाला होता. राहुल गांधींच्या या विधानावरुन भाजप आक्रमक झाली.

सावरकरांबद्दल केलेल्या विधानांवरुन भाजपनं माफीची मागणी केली. मात्र त्यानंतरच्या एका कार्यक्रमात त्याच माफीच्या मागणीवरुन राहुल गांधींनी केलेलं अजून एक विधान वादात आलं.

राहुल गांधींनी हे विधान जेव्हा केलं होतं, त्याचदरम्यान इकडे महाराष्ट्रात मविआचा जन्म होऊन एकच महिना झाला होता. त्यामुळे विधानसभेत भाजपनं शिवसेनेची कोंडी केली होती. त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावरुन तटस्थ भूमिका घेत आदरणीय व्यक्तींबद्दल केलेली विधान चूक असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान माफी न मागण्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी ठाम राहिल्यानंतर तेव्हा सुद्धा सावकरांच्या वंशजांनी एक नवं पत्र दाखवत गांधी आणि काँग्रेसवर आरोप केले होते.

2020 नंतर 2021 मध्ये एका पुस्तकावरुन वाद झाला. आणि तेव्हा सुद्धा सावरकरांच्या मुद्द्यावरुन मविआ आणि भाजप आमने-सामने आली. तेव्हा भाजपनं अजूनही सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? अशी टीका शिवसेनेनं केला होती. तर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी सत्तेत कसे बसलात? असं प्रश्न भाजपनं केला होता.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा उकरुन काढलाय. ज्यावरुन महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.