देवेद्र फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होतील, संजय राऊत यांच्या दाव्यामागचं लॉजिक काय?

| Updated on: Jul 02, 2023 | 4:26 PM

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात बंड केल्याने राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. संजय राऊत यांनी मात्र नवा दावा केला आहे.

देवेद्र फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होतील, संजय राऊत यांच्या दाव्यामागचं लॉजिक काय?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप आज पाहायला मिळाला. रविवारच्या दिवशी एकीकडे लोकं रिलॅक्स मूडमध्ये असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पुन्हा एकदा राजकीय खेळी करत राज्यात नवं समीकरण जुळवून आणलं आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यातील सरकार आणखी मजबूत झालं आहे. कारण जवळपास १५० हून अधिक आमदारांचं संख्याबळ या सरकारकडे आलं आहे.

संजय राऊत यांचा मोठा दावा

खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सोबतच काही दिवसात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तर हे सरकार पडू शकतं. अशी शक्यता होती. पण आता या सरकारला आणखी ४० आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने सरकार वाचलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली तर राज्याला पुन्हा एकदा नवे मुख्यमंत्री मिळतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. असे संकेत त्यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सहभागी- अजित पवार

राजकारणात काहीही होऊ शकतं हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध झालं आहे. अजित पवार यांच्यासह ४० आमदार असल्याने आम्हीच राष्ट्रवादी असा दावा अजित पवार गटाकडून केला जावू शकतो. अजित पवार यांना छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पाठिंबा असल्याने शरद पवार यांच्यापुढचं आव्हान वाढलं आहे.

विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं माझं आणि सहकार्यांचं मत होतं. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानेतृत्वात देशाला पुढे नेण्याचं काम करत असताना आपण पण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. एकीकडे विरोधीपक्ष एकत्र येण्याचा विचार करताय. पण बैठकीतून काहीही आऊटपुट निघत नाहीये. देशाला मजबूत नेतृत्वाची गरज आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.