Ram Mandir | मंदिरात रामाची मूर्ती असणार की, नाही? याची उद्धव ठाकरेंना चिंता, ते असं का म्हणाले?

| Updated on: Jan 13, 2024 | 1:24 PM

Ram Mandir | येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. सगळ्या देशाला याची उत्सुक्ता आहे. पण त्याआधी राजकारणही जोरात सुरु आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

Ram Mandir | मंदिरात रामाची मूर्ती असणार की, नाही? याची उद्धव ठाकरेंना चिंता, ते असं का म्हणाले?
Uddhav thackeray-PM modi
Follow us on

Ram Mandir | उत्तर प्रदेशात अयोध्येत 22 जानेवारीला रामललाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. सगळेच लोक या ऐतिहासिक दिवसाची आतुरतेने वाट पाहतायत. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला यावरुन राजकारणही सुरु आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भाजपा राम मंदिराचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतेय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलय की, ते 22 जानेवारीला भगवान श्रीरामाची पूजा करतील. फरक इतकाच आहे की, पूजा अयोध्येऐवजी महाराष्ट्रात नाशिकमध्ये गोदावरीच नदीच्या तीरावर काळाराम मंदिरात होईल.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, ते आपल्या कार्यक्रमाच राष्ट्रपतींना आमंत्रण देतील. काळाराम मंदिरात मी भगवान रामाच दर्शन घेईन. गोदावरी नदीच्या तीरावर आरती करतील. सोमनाथ मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली, त्यावेळी राष्ट्रपती आले होते. त्यांच्याहस्ते प्राण प्रतिष्ठा झाली होती. 22 जानेवारीला राष्ट्रपतींना बोलवण्याची त्यांनी मागणी केलीय. उद्धव यांच्यामते, ही फक्त भगवान श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा नाहीय, देशाची प्रतिष्ठा आहे.

‘त्यांनी कधी फाफडावरही चर्चा करावी’

‘मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान मोदी फक्त चाय वर चर्चा का करतात? असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी कॉफी, बिस्किट फाफडावरही कधी चर्चा करावी. राम विराजमान होतायत, त्या बद्दल आम्ही दिवाळी साजरी करु. पण देशाच जे दिवाळ काढतायत, त्यावरही चर्चा झाली पाहिजे. ते म्हणाले की, “अटल सेतू बनवला. पण अटलजींचा फोटो नाही लावला. त्यामुळे राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की, नाही याची मला चिंता आहे”