Mahayuti : निकालाआधीच महायुतीती CM पदासाठी सुरु झाली पोस्टरबाजी

| Updated on: Nov 22, 2024 | 1:11 PM

Mahayuti : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच सीएम पदासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. पुणे आणि पर्वती विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Mahayuti : निकालाआधीच महायुतीती CM पदासाठी सुरु झाली पोस्टरबाजी
Ajit Pawar Poster
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. त्याआधीच प्रदेशात पोस्टरबाजी सुरु झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अजित पवारांच अभिनंदन असा मजकूर पोस्टरमध्ये आहे. महायुतीमध्ये या पोस्टरची चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निकाल येण्याआधीच लॉबिंग सुरु केलय. पर्वती विधानसभा क्षेत्र आणि बारामतीमध्ये प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराने हे बॅनर लावले आहेत. यात मतमोजणीआधीच मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. रस्त्यावर लागलेल्या या पोस्टर्सची राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

कार्यकर्त्यांची इच्छा

अजित पवार यांनी चारवेळा महाराष्ट्राच उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्यांना अजून मुख्यमंत्री बनता आलेलं नाही. मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अजित पवार यांनी आतापर्यंत अनेकदा व्यक्त केली आहे. काका शरद पवार यांची साथ सोडून ते सरकारमध्ये भाजपासोबत सहभागी झाले. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मविआचा किती जागा जिंकण्याचा दावा?

उद्या 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात कोणाचं सरकार बनणार ते क्लियर होईल.चारवेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री होतात का? याकडे सगळ्यांच लक्ष असेल. बहुताश एग्झिट पोल्सनी एनडीएच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडीच्या सरकारला बहुमत मिळेल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडी 145 ते 155 जागा जिंकून सरकार बनवण्याचा दावा करत आहे.

शरद पवार गट-अजित पवार गट किती जागांवर आमने-सामने?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 149 जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने 81 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 59 जागा लढवल्या. काँग्रेसने 101, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 95 आणि शरद पवार गटाने 86 जागा लढवल्या. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट 50 जागांवर तर शरद पवार गट आणि अजित पवार गट 37 जागांवर आमने-सामने आहे.