महाविकास आघाडीचे ठरले, विधानसभा निवडणूक या नेत्याच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस हायकमांडने…

| Updated on: Aug 15, 2024 | 12:38 PM

महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस नेत्यांनी काम केली होती. त्यामुळे आता प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली आहे. परंतु यासंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली गेली आहे.

महाविकास आघाडीचे ठरले, विधानसभा निवडणूक या नेत्याच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस हायकमांडने...
मल्लिकार्जून खरगे शरद पवार उद्धव ठाकरे
Follow us on

राज्यातील विधानसभेची मुदत २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांमध्ये हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीने निवडणूक रणनीतीसाठी चांगलीच आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिल्ली वारी केली. राज्यातील नेत्यांऐवजी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली. त्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा परिणाम म्हणून आता महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख ठरले आहे. महाविकास आघाडीत कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार? त्यासंदर्भातील आदेश काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्र सांभाळणार आहेत.

महाविकास आघाडीचे नेमके काय ठरले?

राज्यातील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रचार प्रमुख असणार आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील नेत्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकीत निघणाऱ्या रॅली, प्रचार सभांमध्येसुद्धा काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. काँग्रेस नेत्यांना काँग्रेस हायकमांडकडून ही माहिती दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस नेत्यांनी काम केली होती. त्यामुळे आता प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली आहे. परंतु यासंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली गेली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यासंदर्भात उत्सुक्ता आहे. परंतु उद्धव ठाकरे सध्या केवळ प्रचार प्रमुख असणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहर निश्चित करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली होती. त्या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या प्रचार प्रमुख नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.