कोलकाता: पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे. (Mamata Banerjee writes letter to 15 Opposition leaders)
ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, डीएमकेचे एमके स्टॅलिन, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री जनग रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचं आवाहन केलं आहे. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी या पत्रातून केलं आहे.
राज्यपालांच्या आडून कोंडी
यावेळी ममता बॅनर्जी यांनी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया (दुरुस्ती) विधेयकाचाही उल्लेख केला आहे. हे विधेयक संघ व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे. भाजप हे केवळ दिल्लीच्याबाबत करत नाही. तर संपूर्ण देशात हाच प्रकार सुरू आहे. गैर भाजपाशासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून समस्या निर्माण केल्या जात आहेत, असं सांगतानाच नियोजन आयोगाचं नाव नीती आयोग ठेवल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
विधानसभेनंतर एकत्र या
भाजप सरकारने सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा विरोधी पक्षांच्या विरोधात वापर सुरू केला आहे. मोदी सरकारच्या आदेशामुळेच ईडीने केवळ टीएमसी नव्हे तर डीएमकेसहीत अन्य पक्षांच्या नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे, असं सांगतानाच आता लोकशाही आणि संविधानावरील भाजपचं आक्रमण परतवून लावण्यासाटी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. सर्व समानविचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्रं यावं. विधानसभा निडवणुकीनंतर याबाबत एक ठोस योजना बनविण्याची गरज आहे, असंही ममता दीदींनी म्हटलं आहे. (Mamata Banerjee writes letter to 15 Opposition leaders)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 31 March 2021https://t.co/agiDudJrt8
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
संबंधित बातम्या:
सरकारने एक दिवसआधीच जनतेला एप्रिल फूल बनवले, भाजपची टीका
West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझं गोत्र ‘शांडिल्य’, असदुद्दीन ओवेसी भडकले!
पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी मोदींच्या पत्राला दिले उत्तर; काश्मीरवर म्हणतात…
(Mamata Banerjee writes letter to 15 Opposition leaders)