Manoj Jarange Patil : माझं पाणीपाणी झालं, मी मुख्यमंत्र्यांना शेवटच सांगतो…मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

| Updated on: Jan 13, 2025 | 1:08 PM

Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी जाग व्हायची वेळ आलीय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते मस्साजोगमध्ये आहेत. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. त्यांनी खाली यावं, यासाठी मनोज जरांगे पाटील हे मध्यस्थी करत आहेत. त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Manoj Jarange Patil : माझं पाणीपाणी झालं, मी मुख्यमंत्र्यांना शेवटच सांगतो...मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
massajog protest
Follow us on

“संतोष देशमुख एक आदर्श माणसू त्याचा खून होतोय. त्याचा भाऊ न्याय मागण्यासाठी वणवण फिरतोय. त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येतेय. ब्रेकिंग बघितल्यावर शॉकच बसला. आंदोलन वैगेर ठिक आहे, पण आत्महत्या म्हणजे महाराष्ट्र बिथरुन गेल्यासारखा आहे. आम्ही तातडीने निघालो, तिकडे अर्ध्यावर फोन आला, तो गायब झाला. पाणीपाणी झालं माझ्या शरीराच” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. “हे असं कसं होऊ शकतं, सरकार जाणूनबुजून हे करतय. मुख्यमंत्र्यांना एकच सांगिन भाषणात आणि सत्तेमध्ये मजा नाही. गरीब मराठा समाजाच्या हालपेष्ट बघणं हे सुद्धा मुख्यमंत्र्यासाठी चांगलं नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“शेवटच एकच सांगेन मुख्यमंत्र्यांना, देशमुख कुटुंबातील जर एखाद्या माणसाला काही झालं, आरोपी सुटला, तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असो किंवा धनंजय मुंडेंच्या टोळीतील कोणी, जगणं मुश्किल करीन मी. खरच उलट्या काळजाचा आहे मी. माझं अंग थरथर कापायला लागलं. या कुटुंबाला मुख्यमंत्र्याकडे जावं लागणं हे सुद्धा चुकीच आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘धनंजय मुंडेंच जगणं मुश्किल करेन’

“मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर कुटुंबाने विश्वास ठेवला. त्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे. ही वेळ त्यांच्यावर येणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना हलक्यात घेऊ नये. तुम्ही हसू नका. इथे गोड बोलीन, आरोपींना वाचवीन तर इथे शेकड्यात नाही, हजारोंने पुरावे आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “कुटुंबाला काय झालं, आरोपी सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी नीट राहणार नाही. मी माझ्या जातीला रिझल्ट देतो, मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. मी एकदा बोललो. धनंजय मुंडेच्या टोळीच जगणं मुश्किल करेन” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘पोलीस एक तास लेट येतात’

“धनंजय देशमुख यांच्याशी मी तीनदा बोललो. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री आरोपींना कसा सोडतो ते बघू. मुख्यमंत्री 100 टक्के न्याय देतील हे माझ्या तोंडात शब्द होते. मुख्यमंत्री अधिवेशनात बोलले होते. त्यांच्या कुटुंबावर आत्महत्येची वेळ येते. हा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा, मुख्यमंत्री जड जाईल तुम्हाला. पोलीस एक तास लेट येतात. हे खूप मोठं षडयंत्र आहे” असा मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला.