मराठ्यांच्या 5 ते 10 हजार पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न; मनोज जरांगे यांचा दावा

| Updated on: Nov 07, 2023 | 1:04 PM

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, ओबीसी नेत्यांचं मराठा तरुणांविरोधात षडयंत्र सुरु आहे. मराठा नेत्यांनीसुद्धा उघड उघड मराठा तरुणांच्या पाठीशी उभं राहावं. ते जरी उभे राहत नसतील तरी आम्हाला तशी नेत्याफित्याची गरज नाही. मराठा तरुणांची संख्या भरपूर आहे. आम्ही थोडे नाही 54 टक्के एकटे मराठे आहोत. हात जोडून सांगतो तुम्ही आमच्या वाटेला येऊ नका.

मराठ्यांच्या 5 ते 10 हजार पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न; मनोज जरांगे यांचा दावा
manoj jarange patil
Follow us on

दत्ता कानवटे, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 07 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या 5 ते 10 हजार पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केलाय. आमचं आंदोलन शांततेत सुरु आहे ते त्यांना रोखता येत नाही म्हणून खोटेनाटे आरोप लावून मराठ्यांच्या पोरांना अडकवलं जात असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. गेल्या 2 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतायत, उपोषण करतायत. हे आंदोलन शांततेत पार पडलं पण जे आंदोलन शांततेत पार पाडलं जातंय ते बिघडवण्याचा प्रयत्न काही ओबीसी नेत्यांचा आहे असं जरांगे पाटील म्हणालेत.

मराठा तरुणांची संख्या भरपूर

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, ओबीसी नेत्यांचं मराठा तरुणांविरोधात षडयंत्र सुरु आहे. मराठा नेत्यांनीसुद्धा उघड उघड मराठा तरुणांच्या पाठीशी उभं राहावं. ते जरी उभे राहत नसतील तरी आम्हाला तशी नेत्याफित्याची गरज नाही. मराठा तरुणांची संख्या भरपूर आहे. आम्ही थोडे नाही 54 टक्के एकटे मराठे आहोत. हात जोडून सांगतो तुम्ही आमच्या वाटेला येऊ नका.

5 ते 10 हजार पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

छगन भुजबळांच्या नातेवाईकाचे हॉटेल जाळणारा दुसरा तिसरा कुणीही नसून त्यांच्याच समाजातील होता त्याला अटक देखील करण्यात आलीये अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांकडून मला मिळाली असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यावेळी म्हणालेत. महाराष्ट्रातील सर्व मराठा नेत्यांना विनंती आहे की जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. मराठ्यांच्या 5 ते 10 हजार पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलाय. देशात आम्ही जवळपास 32 कोटी आहे. आम्हीही काही कमी नाही. राज्यातही आम्ही 54 ते 60 टक्के आहोत, एकटेच मराठे. तुम्ही आम्हाला त्या वाटेवर येऊ देऊ नका. हात जोडून सांगतो. आमच्या पोरांना त्रास देऊ नका असंही ते यावेळी म्हणालेत.