आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही : जयंत पाटील

| Updated on: Nov 07, 2020 | 5:28 PM

राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.

आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही : जयंत पाटील
Follow us on

रत्नागिरी : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी आमची शिफारस यादी राज्यपालांकडे (Governor) दिली असून यावर 15 दिवसांत निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती राज्यपालांना केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी दिली आहे. यावेळी बोलताना आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे इथं ते पत्रकारांशी बोलत होते. (Many leaders was exited for MLA seat we cant fulfill everyones desire said by Jayant Patil)

महाविकास आघाडीकडून दिलेल्या यादीवर 15 दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा अशी विनंती महाविकास आघाडीने राज्यपालांना केली आहे. तर राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणं स्वाभाविक आहे. पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू असंही यावेळी जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटलाही प्रत्युत्तर दिलं आहे. घरात बसून चंद्रकांत दादांनी ट्विटकरून काय भूमिका व्यक्त केली. यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. यावेळी मराठा आरक्षणावरही महाविकासआघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं जयंत पाटील म्हणाले.  (Many leaders was exited for MLA seat we cant fulfill everyones desire said by Jayant Patil)

जयंत पाटलांनी यावेळी अर्णव गोस्वामीच्या कारवाईवरही भाष्य केलं आहे. अर्णव गोस्वामीला अटक झाल्यामुळे विरोधी पक्षाने महाविकास आघाडीवर अनेक टीका केल्या. यावर अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई का झाली? याचा अभ्यास भाजपने केलेला दिसत नाही असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.

रक्षा खडसेंच्या आंदोलनाचं राष्ट्रवादीकडून समर्थन?
दरम्यान, रावेरमधील भाजप खासदार रक्षा खडसे येत्या 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाच्या खासदार जरी असल्या तरी जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्या भूमिका मांडताहेत, त्यात वावगं ते काय?’ जयंत पाटलांच्या या प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार रक्षा खडसे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेचं समर्थन केलं जात आहे का? अशा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

संंबंधित बातम्या – 

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा

खासदार रक्षा खडसेंचा निर्धार, 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

(Many leaders was exited for MLA seat we cant fulfill everyones desire said by Jayant Patil)