“मी नारायण राणे यांच्यावर टीका केली नाही. त्यांनी आरक्षण दिले होते, म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही त्यांना दादा म्हणतो. तुम्हाला शेवटचे सांगतो, माझ्या नादी लागू नका. जी वळवळची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला पश्चाताप होईल आणि मी तुला तुम्हाला एक शेवटची संधी देतो. तुम्ही नीट शहाणे व्हा” मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे. “राणे पिता-पुत्राला दोष द्यायचे काही कारण नाही, हे सर्व देवेंद्र फडवणीस करत आहे. देवेंद्र फडणवीस मराठयांच्या काही लोकांना रोज तुकडे फेकतो. मी जातीचे काम करतो म्हणून माझ्यावर हे लोक सोडले आहेत. देवेंद्र फडवणीस यांना मराठ्यांमध्ये वाद घडवून आणायचे आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“फडवणीस यांचे ऐकून जे बोलत आहेत, त्यांना लोक धडा शिकवतील आणि पळता भुई कमी होईल. आणखीही फडवणीस यांनी विचार करावा तुझे काय होऊ शकते. दरेकर आणि फडवणीस यांनी रचलेले हे अभियान आणि ट्रॅप आहे आणि राणेंसह इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “हे सर्व मराठ्यांच्या विरोधातील ढाकू माकू आहेत ( राम कदम ). फडवणीस सुफडे साफ करण्याच्या दिशेने निघाले आहेत. राणेंना लक्षात येणार नाही, मी जातीसाठी करतो आणि तुम्ही फडणवीसांसाठी करतात, 96 कुळी मराठे काय असतात हे तरी माहीत आहे का?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.
‘ज्यांनी 96 कुळी मराठ्यांच्या आई बहिणीवर लाठीमार केला’
“आम्हला आरक्षण नको, आम्ही 96 कुळी आहेत, याला 96 कुळी नाही म्हणतं. राणे हे त्या फडवणीसच्या नादी लागले आहेत, ज्यांनी 96 कुळी मराठ्यांच्या आई बहिणीवर लाठीमार केला. ज्या देवेंद्र फडणवीसने गोळ्या घालायला लावल्या, त्याच्या बाजूने 96 कुळी बोलत नसतो. कोणाला शिकवतो रे 96 कुळी आणि 95 कुळी. देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे वाटोळे करू नका. राणेंच्या लेकरांचे हाल नाहींत, ते मराठ्यांच्या नावावर खुप मोठे झाले आहेत, त्यांचे परदेशापर्यंत व्यवसाय आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘तुम्हाला ही शेवटची संधी देत आहे’
“त्यांचे ऐश्वर्या मराठ्यांच्या जीवावर आहे. आरक्षणची गरज तुम्हाला वाटत नाही, आमच्या ताटात माती कालवू नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही फडवणीस यांचे ऐकू नका, नाहीतर पळता भुई थोडी होईल, आणि तुम्हाला ही शेवटची संधी देत आहे” मनोज जरांगे पाटील यांनी असा इशारा नारायण राणेंना दिला.
‘तुम्हाला सन्मान कळतो का?’
“नारायण राणे यांनी मला धमकी दिली आणि आम्ही त्यांना दादा म्हणतो, पण आम्ही ब्र शब्द काढला नाही, मी त्यांना मराठवाड्यात येऊन दाखवा असे म्हणालो नाही. ते मनानेच म्हणाले आहेत. मी येऊन दाखवतो. मी जेव्हा म्हणालो तेव्हा नाही आले, गाव बंदी होती. त्या झापक्यात यायला पाहिजे होते. आम्ही धमक्या देत नाही त्यांना, आम्ही क्षत्रिय मराठे आहोत आणि उपकार जाणतो. तुम्ही ( राणे ) देवेंद्र फडणवीससाठी मला आणि माझ्या समजला अडचणीत आणत असताल तर मी मोजत नाहीय आम्ही तुमचा सन्मान करतो आणि तुम्हाला सन्मान कळतो का?” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.