Manoj jarange Patil | “संचारबंदी का लावली? कारण काय? अंबड तालुक्यात संचारबंदी लावली म्हणजे आम्हाला मुंबईत येऊ द्यायच नाहीय. फडणवीसांनी रात्री बंदुकीची फोटो टाकला. दम होता तर थांबायच, आम्हाला येऊ द्यायच नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. थोड पुढे गेल्यावर होणार होता. म्हणून सकाळी निघण गरजेच होतं. कोणाकडे काहीच साहित्य नव्हतं. देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायत सगळं. एक-दोन तासात निर्णय घेऊ” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मी बघणार त्याच्याकडे. तुम्ही शांत रहा. त्याच्यात किती दम होता, मला माहितीय. सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करावीच लागेल. याचा परिणाम मराठ्यातच नाही, सगळ्या जाती-धर्मात होणार. फडणवीसांविषयी नाराजीची लाट उसळणार. आजच्या आज सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करा. तुझ्याशिवाय कलेक्टर संचारबंदीचा आदेश काढू शकत नाही. विचार करुन पुढच पाऊल टाकाव लागणार. त्याचा रात्रीचा डाव मोडला. आपण सगळ्यांना एकविचाराने पुढे जावं लागेल. महिलांवर रात्री हात उचलायला लावणार होता. राज्यकर्त्यांना हे शोभत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये’
“तुझ्यात दम असेल, तर सागर बंगल्यावर ये. तुला जातीवर आव्हान केलं होतं. तू बामणाचा असला, तरी मी खानदानी मराठा आहे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला. बघतो सत्ता कशी येते, दम लागतो. एक तासात सांगंतो, तो रात्रीच करणार होता. जनता काम केल्यावर आदर करते” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. एकही मराठा अडचणीत येता कामा नये. मराठ्यांनी शांत रहाव, माझ आवाहन आहे. दोन तासात निर्णय घेणार आहे. बैठक अंतरवली सराटीत होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.