पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार

| Updated on: Nov 20, 2020 | 1:31 PM

राज्यातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे, असं सांगतानाच राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. (Maratha woman should be the Chief Minister of Maharashtra: ashish shelar)

पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार
Follow us on

मुंबई: राज्यातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे, असं सांगतानाच राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. (Maratha woman should be the Chief Minister of Maharashtra: ashish shelar)

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे (Vijay Chormare) यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ (Kartutvavan Maratha Striya) या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं.

यावेळी शेलार यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने लढवय्या मराठा स्त्रियांच्या संघर्षाचा आढावा घेतला. एखाद्या व्यक्तीने पीएचडी करावं आणि त्यावर मुंबई विद्यापीठात संशोधन व्हावं, असं हे पुस्तक असल्याचं शेलार म्हणाले. तसेच चोरमारे यांनी हे पुस्तक सावित्रीबाई फुलेंना अर्पण करून या पुस्तकातून एका जातीचं उदात्तीकरण करण्यात आल्याच्या मानसिकतेलाही छेद दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

महाराष्ट्रात मोठ्या पदावर बरीच लोकं, पण…

महाराष्ट्रात मोठ्या पदावर बरीच लोक बसली आहेत. पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती या महाराष्ट्रात कमी दिसतात. मला तुलना कुणाशी करायची नाही पण अशा व्यक्ती कमी आहे, अशी खंतही शेलार यांनी व्यक्त केली.

तर, शरद पवार यांनी लोकांना माहीत नसलेल्या स्त्रियांचा इतिहास या पुस्तकाच्या रुपाने नव्याने आणल्याबद्दल चोरमारे यांचं कौतुक केलं. या पुस्तकातील हौसाबाई पाटील, जयमाला शिलेदार, आनंदीबाई शिर्के, हिराबाई बडोदेकर आणि लक्ष्मीबाई नायकवाडी आदी भगिनींना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. यातील काही महिला या विधीमंडळाच्या सदस्यही राहिलेल्या आहेत. त्यांचं कर्तृत्व अत्यंत मोठंही आहे, असं पवारांनी सांगितलं.

वैद्यकीय क्षेत्रात सर्वात आधी योगदान देणाऱ्या डॉ. रखमाबाईंबद्दल वेगळ्या पद्धतीने मांडणी करता आली असती, असंही ते म्हणाले. या प्रसंगी त्यांनी ताराबाई शिंदे यांच्या योगदानाचा आढावाही घेतला. या पुस्तकातील महिलांच्या संघर्षाचं वास्तव अत्यंत चांगल्या पद्धतीनं आलं आहे, असं सांगतानाच या पुस्तकातील काही उणीवा ज्ञानेश्वर महाराव यांनी कमी केल्या आहेत. काही त्रुटी असून नव्या आवृत्ती चोरमारे या उणीवा दूर करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

संबंधित बातम्या:

LIVE | कर्तृत्वान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आशिष शेलारांचं पवारांसमोर भाषण

काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही, आधी जनतेने झिडकारलं, आता महाविकास आघाडी : आशिष शेलार

(Maratha woman should be the Chief Minister of Maharashtra: ashish shelar)