उस्मानाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे, अशावेळी निकषांच्या बाहेर जाऊन मदत करावी लागेल. राज्य सरकारने गप्पा बंद कराव्यात. तुमचं राजकारण होतं, मात्र शेतकऱ्यांचं मरण होतं, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केलाय. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी मदत केली नाही तर भाजप आंदोलन करणार, असा इशाराच फडणवीस यांनी उस्मानाबादेत दिलाय. (Devendra Fadnavis demands to help farmers before Navratri, warning of agitation)
महाविकास आघाडी सरकारकडून सध्या जबाबदारी टाळणे व पुढे ढकलणे सुरू आहे. अनेक पालकमंत्री शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आले नाहीत. असा आरोप फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील पत्रकार परिषदेत केला. यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी उपस्थित होते. फडणवीस आणि दरेकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील करजखेडा, चिखली, दाऊतपूर, तेर या गावातील नुकसानाची पाहणी केली.
This is the condition of just one farm in Dautpur village in Osmanabad. Hundreds and hundreds of farms in Marathwada are destroyed like this one..
उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपूर/इर्ला येथील हे एक शेत. अशी अवस्था येथील अनेक शेतांची झाली आहे.#Flood #heavyrain pic.twitter.com/0mGigWaFfW— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2021
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. गेल्या 4 दिवसांपासून मराठवाडा दौरा करतोय. इथे भीषण परिस्थिती पाहायला मिळाली आहे. 25 लाख हेक्टर शेती एकट्या मराठवाडा भागात बाधीत झाली आहे. त्यात सोयाबीन पिकाचे जास्त नुकसान झालं आहे. सोयाबीन अक्षरश: शेतात कुजली आहेत. सोयाबीनला दाणा नाही, पाऊस पडल्याने शेतात उभा असलेल्या काडाला कोंब आले आहेत, सोयाबीन सडल्यामुळे दुर्गंधी येत आहे, असं फडणवीस म्हणाले.
शेतकरी आक्रोश करीत आहे. पावसाने खराब झालेली शेती साफ करायची असेल तर एकरी 5 ते 6 हजार खर्च येणार आहे. मात्र शेतकऱ्याकडे आता शेत साफ करण्यासाठीही पैसे नाहीत. सर्व पिकांवर संकट आहे. त्यात सोयाबीन, कापूस पिकांचं मोठं नुकसान होत आहे. राज्य सरकारकडून मोठी मदत मिळावी अशी शेतकरी आणि आम्हालाही अपेक्षा असल्याचं फडणवीस म्हणाले.
पाहणी दौरा करताना शेतकरी सांगते होते की, तुमच्या सरकारच्या काळात विमा व इतर आर्थिक मदत थेट मिळत होती. मात्र, आता या सरकारच्या काळात ती मिळत नाही. जमीन खरडून गेली आहे. ती दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र, शेतकरी आता तेही करु शकत नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.
LIVE | Media interaction in, Ter #Osmanabad#farmer #marathwada #MaharashtraRains #Maharashtra https://t.co/auK32OwQ2V
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2021
भाजप सरकारच्या काळात आम्ही 6 वर्षात एक-एक जिल्ह्याला 800 कोटी मदत म्हणून दिले. मागील वर्षी पूर्ण राज्यात मिळून 800 कोटी सुद्धा मिळाले नाहीत. 10 वी नापास मुले विमा कंपनीने नेमले आहेत. ते शेतकऱ्यांना 500 रुपये दिले तर नुकसान जास्त दाखवू असं म्हणून विमा पंचनामे करताना लूट करीत आहेत. ऑनलाईनसह ऑफलाईन माध्यमातून विमा मिळावा. सरकारने विमा कंपनीशी चर्चा करून महसूल विभागाने दिलेला नुकसानीचा रिपोर्ट ग्राह्य धरावा. आता विमा कंपनी पंचनामे करीत आहेत ते चुकीचे आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी कोर्टात लढाई लढत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
अनेक जिल्ह्यात, नुकसानग्रस्त भागात पालकमंत्री आले नाहीत. त्यांनी मदत केली नाही किंवा सरकार मदतीची घोषणा करत नाही. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावे, अशी आमची मागणी आहे. या पाहणी दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी कुजके सोयाबीन दिले व ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यास सांगितलं आहे. शेतकरी संकटात असताना वीज कनेक्शन तोडणे सुरू आहे. वाढीव बिल दिले जात आहे. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना एकरी 25 ते 50 हजार मदत करा अशी मागणी करणारे आणि त्यावेळी विमा कंपनी फोडणारेच आज सत्तेत आहेत. मात्र आता ते गप्प आहेत, असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
जलयुक्त शिवार योजनेमध्ये खोलीकरण झाले म्हणून आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया काही शेतकरी देत आहेत. आता तुम्हीच खोलीकरण करा अशी मागणी करीत आहेत. मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची शेतकरी आठवण काढत असल्याचं फडणवीस म्हणाले.
?Osmanabad | उस्मानाबाद.
Entered Osmanabad district a while ago. Interacted with farmers at Karajkheda.
लातूरचा दौरा उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केला.
करजखेडा येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून निवेदने स्वीकारली.#MaharashtraRains pic.twitter.com/ktNddAuEm0— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2021
शेतकऱ्यांना केंद्राकडून निश्चितपणे मदत होईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलंय. 2004 ते 2014 या कालावधीत राज्याने केंद्राकडे 26 हजार कोटींची मागणी केली त्यापैकी 3 हजार 700 कोटी दिले. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या 5 वर्षाच्या भाजप सरकारच्या काळात राज्याने 25 हजार कोटी मागितले त्यापैकी 11 हजार कोटी केंद्राने मदत दिले आहेत. भाजप सरकारच्या काळात 3 पट पैसे केंद्राने राज्याला मदत म्हणून दिले. नुकसान जास्त झाल्याने निकष बदलणे गरजेचे आहे. ज्या बहुभूधारक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, त्यांना पण मदत करणे गरजेचं आहे. त्यासाठी निकष बदलणे आवश्यक असल्याचंही फडणवीस म्हणाले.
इतर बातम्या :
केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा, नाना पटोलेंचा घणाघात
Devendra Fadnavis demands to help farmers before Navratri, warning of agitation