मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना खास शुभेच्छा दिल्या आहे. नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असंही नार्वेकर यांनी म्हटलंय. त्याचवेळी नार्वेकर यांचं अजून एक ट्वीट सध्या चर्चिलं जात आहे. हे ट्वीट नार्वेकर यांनी 26 जुलै अर्थात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारलेला पहिला प्रश्न, नार्वेकर यांनी या ट्वीटमध्ये सांगितला आहे. (What was first question that Uddhav Thackeray asked Milind Narvekar?)
‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?” उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली. आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’, असं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं होतं.
त्यावरुन नार्वेकर यांनी 1994 मध्ये आपल्याला शाखाप्रमुख बनण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुला शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे? असा प्रश्न विचारला होता. नार्वेकर यांनी या ट्वीटमध्ये एक जुना फोटोही शेअर केला आहे.
तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली.
आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा?
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) July 26, 2021
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकंच नाही तर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असं ट्वीटही नार्वेकर यांनी केलं आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 7, 2021
संबंधित बातम्या :
तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक
‘बेस्ट’च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणतात, देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, कारण….
What was first question that Uddhav Thackeray asked Milind Narvekar?