रत्नागिरी : “काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही,” असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. यावरुन महाविकासआघाडीत वाद निर्माण होत असतानाच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर पडदा टाकला आहे. “मुख्यमंत्री निधी देताना कुठलीच काटकसर करत नाहीत,” असे प्रत्युत्तर सत्तार यांनी या प्रश्नावर दिले. (Abdul sattar on ashok chavan comment Donation)
महाविकासआघाडी पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या खात्यासहित त्यांच्या मतदार संघापर्यत निधी दिला जातो. तिन्ही नेत्यांच्या लोकप्रतिनिधींचा सन्मान मुख्यमंत्री नेहमी करतात. मुख्यमंत्री निधी देताना ते कुठलीच काटकसर करत नाहीत, अशा शब्दात सत्तार यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं.
कुठे तरी एका दुक्का चुकला असेल. महाविकासआघाडीचं पहिलं सरकार की जिथे मंत्र्यांना इतके अधिकार देण्यात आले आहे. मुख्यमंत्री इतक्या पारदर्शक पद्धतीने काम करत आहेत, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
महाविकासआघाडीतील नेत्यांना मराठा आरक्षण मिळू नये असं वाटतं, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.
गिरीश महाजन यांनाच मराठा समाज्याला आरक्षण मिळू नये असं वाटत असावं. महाविकासआघाडीतील सर्वच नेत्यांना आरक्षण मिळावं असं वाटतं आहे. मात्र ज्यांना असं वाटत नाही, तेच दुसऱ्याच्या खांद्यावर बदूक ठेवून गोळ्या चालवतात, असा उपरोधिक टोला सत्तार यांनी महाजनांना लगावला आहे.
अशोक चव्हाण काय म्हणाले होते?
“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. (Abdul sattar on ashok chavan comment Donation)
संबंधित बातम्या :
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप; आघाडीत खळबळ
शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?, संजय राऊतांचा विरोधकांना जमालगोटा