मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) प्रकरणानंतर शिवसेनेतून डावलले जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचीच खदखद आज रामदास कदम यांच्या तोंडून बाहेर पडली. कदम यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अनिल परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केलाय. तसंच तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण? असा संतप्त सवालही कदम यांनी केलाय. कदम यांच्या या आरोपांवर आता स्वत: अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंद यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
रामदास कदम यांनी केलेले आरोप आणि टीकेबाबत पत्रकारांनी अनिल परब यांना प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना परब म्हणाले की, ‘मी याबाबत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही. मी शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल’. कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देणं परब यांनी टाळल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कदम यांनी परबांवर केलेल्या टीकेबाबत सावध प्रतिक्रिया दिली. ‘ज्या प्रकारे शिवसेनेनं त्याठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाली आहे. त्याचं नेतृत्व अनिल परब करत आहेत. आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत. त्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. पण रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी अनेकवेळा नेतृत्व केलं आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेवर माझ्यासारख्या शिवसैनिकानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही’, असं सामंत म्हणाले.
वांद्रेमधून अनिल परब यांनी विधानसभेची किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असं खुलं आव्हान रामदासस कदमांनी दिलंय. मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठलेत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केलाय. दोन वर्षात माझ्या मुलाचा त्यांनी एकदाही फोन घेतला नाही, असा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलाय. संजय कदमशी सातत्यानं अनिल परबांनी संबंध ठेवल्याचंही त्यांनी म्हटलंय. वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना नेहमी पाठीशी घालण्याचं काम अनिल परबांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, असं म्हणज रामदास कदमांनी पोस्टरही पत्रकार परिषदेत दाखवले. याबाबत आपण सुभाष देसाई आणि अनिल देसाईंनाही सांगितल्याची माहिती रामदास कदमांनी यावेळी दिली.
इतर बातम्या :