रईस शेख, मनमाड : एखादा ग्रामपंचायत सदस्य जरी झाला तरी त्याच्या डोक्यात भलती हवा जाते. त्याचं वागणं बदलतं, राहणीमान बदलतं… पण राजकारणात राहूनही अशी काही माणसं असतात, ज्यांचे पाय जमिनीवर असतात, त्यांच्या वागण्या-बोलण्यात काही फरक पडत नाही. त्यातलंच एक नाव म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित मंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar)………!
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भारती पवार महाराष्ट्रात आहेत. कालवणला जात असताना रोडवरच्या एका चहाच्या टपरीवर त्यांनी चहाचा अस्वाद घेतला. तसंच आपल्या सोबतच्या लोकांना देखील त्यांनी चहा वाटला. यावेळी आपण केंद्रीय मंत्री आहोत, हे त्या विसरुन गेल्या होत्या.
गेल्या महिन्यात डॉ. भारती पवार यांची मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रिपदी निवड झाली. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. पण मंत्री झाल्यावरही त्यांनी आपला साधेपणा जपला. आपल्याकडे दिलेल्या खात्याचा चार्ज घेण्यासाठी जेव्हा भारती पवार कार्यालयात गेल्या तेव्हा त्यांनी आपल्या पायातील चपला कार्यालयाबाहेर काढल्या. यावेळी कार्यालयातील अधिकारी वर्ग अवाक झाला. या प्रसंगानंतर त्यांचं देशात कौतुक झालं होतं.
हे ही वाचा :
जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या डॉ. भारती पवारांचा राजकीय प्रवास