अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी देश आणि राज्यात सर्वत्र साजरी झाली. कोरोना प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं शिवजयंतीसाठी काही नियमावली लागू केली होती. पण काही ठिकाणी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र अकोल्यात पाहायला मिळालं. अकोल्यातील अकोट तालुक्यातील कुसाटा गावात विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अमोल मिटकरी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.(MLA Amol Mitkari charged with violating Corona rules)
आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शेकडो लोक उपस्थित होते. या मिरवणुकीत सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचलाय. अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन सुरु झालेलं हे वाकयुद्ध अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही. मिटकरी आणि पडळकर यांच्यातील वादात आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे.
अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. इतकच नाही तर आम्ही सगळं केलं पण सामान्य माणसांचे खिके कापले नाहीत, असा पलटवारही खोतांनी लगावला आहे. “तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. त्याला आता खोतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण सामान्य माणसांचे खिसे कापले नाहीत’, सदाभाऊंचं मिटकरींना प्रत्युत्तर https://t.co/s0R7Md53JG @Sadabhau_khot @amolmitkari22 @BJP4Maharashtra @NCPspeaks #AmolMitkari #gopichandpadalkar #gopichandpadalkarrocks #SadabhauKhot
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
संबंधित बातम्या :
मिटकरी बाजारू विचारवंत, पडळकर पिसाळलेली वृत्ती; मिटकरी-पडळकर जुंपली
MLA Amol Mitkari charged with violating Corona rules