तुझे मुंडके धडापासून वेगळे करू, ही धमकी नाही, डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे; भाजप आमदाराला पीएफआयचं धमकीचं पत्रं

| Updated on: Oct 08, 2022 | 8:17 AM

या धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तुझे मुंडके धडापासून वेगळे करू, ही धमकी नाही, डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे; भाजप आमदाराला पीएफआयचं धमकीचं पत्रं
तुझे मुंडके धडापासून वेगळे करू, ही धमकी नाही,
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर: पीएफआय (PFI) या संघटनेवर बंदी आणण्यात आली असली तरी या संघटनेच्या कारवाया थांबताना दिसत नाही. या संघटनेच्या एका कार्यकर्त्याने भाजपचे (bjp) आमदार विजयकुमार देशमुख (vijaykumar deshmukh) यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्रं आलं आहे. तुझे मुंडके धडापासून वेगळे करू. ही फक्त धमकी समजू नका. हा आमचा डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. तसेच तुम्ही आमच्यासारख्या लोकांच्या विषारी सापांच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. आमची मुलं गप्प बसणार नाहीत. घराघरात कसाब, अफजल गुरु, याकूब जन्माला येतील, असा इशाराही या पत्रातून देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआय कार्यकर्त्याकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यातआली आहे. विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत. मोहम्मद शफी बिराजदार नावाच्या व्यक्तीच्या नावाने हे पत्रं आलं आहे.

बिराजदार हा सोलापूरमधीलच रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे. तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहोत. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

अयोध्या, काशी आणि मथुरेत आमचे सुसाईड बॉम्बर आहेत. एका दिवसात उडवून दहशत माजवतील. आम्ही मुसलमान आहोत. याशिवाय आता आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

तुम्ही पीएफआयवर बंदी घालून चुकीचे काम केलं आहे. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे. यापूर्वी सीमीवर देखील बंदी घालण्यात आली होती. त्याचे काय झाले? बंदी फोल ठरली. तुम्ही पीएफआयवर लाखवेळा बंदी घातली तरी आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, असा दावाही या पत्रातून करण्यात आला आहे.

तुम्ही लोकांनी आमच्यासारख्या विषारी सापांच्या शेपटीवर पाय ठेवला आहे. आता आमची मुले गप्प बसणार नाहीत. घराघरात कसाब, अफजल गुरु, युसूफ, याकूब जन्माला येतील ही गोष्ट लक्षात घ्या, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

दरम्यान, या धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.