मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा (Raj Thackeray Ayodhya Tour) स्थगित केला आहे. तूर्तास हा दौरा स्थगित केला असल्याची घोषणा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. 5 जून रोजी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार होता. हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. 5 जून रोजी होणारा राज ठाकरे (Raj Thackeray News) यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता टीव्ही 9 मराठीच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ठीक दहा वाजता याबाबत ट्वीट (Raj Thackeray Tweet) केलंय. अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केली. आता पुण्यात 22 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पुण्यात मनसैनिकांकडून करण्यात येतेय. या सभेमध्ये राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. राज ठाकरेंनी याआधी केलेल्या आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केला असल्याचं आरोप बृजभूषण सिंह यांनी केल्यानंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अधिकच चर्चेत आला होता. दरम्यान, आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याचं स्पष्ट केलंय.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित का झाला, त्याचा उहापोह राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेत करतील. मात्र आतापासून त्यांनी दौरा रद्द का केला, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीला पुरेसा वेग आलेला नव्हता, असंही सांगितलं जातं. तसंच रेल्वेचं आरक्षणही झालेलं नव्हतं. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी 5 जूनला दौरा स्थगित करण्यात आला असावा, असा तर्क लढवला जातोय.
आता राज ठाकरेंची पुण्यात 22 मे रोजी सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा केंद्र इथं सभा होणार आहे. या सभेचा पोस्टरही नुकताच अमेय खोपकर यांनी शेअर केला होता. त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या पुण्यातील सभेत काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.