‘या’ तीन मुद्द्यांवरुन अजित डोभालांवर ‘राजस्ट्राईक’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बँकॉक येथे भेटले. काय झालं ह्या बैठकीत? असा गंभीर सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरुन केंद्र सरकरावर निशाणा साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ला, एअर […]

या तीन मुद्द्यांवरुन अजित डोभालांवर राजस्ट्राईक
Follow us on

मुंबई : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बँकॉक येथे भेटले. काय झालं ह्या बैठकीत? असा गंभीर सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरुन केंद्र सरकरावर निशाणा साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक ते नरेंद्र मोदी, भाजप इत्यादी मुद्द्यावर सडेतोड भाष्य केले.

डोभाल आणि पाकिस्तानी सुरक्षा सल्लागारांची भेट

14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यापूर्वी 27 डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये भेट झाली होती. ही भेट का झाली? आम्ही प्रश्न विचारायचा नाही का? त्या बैठका कशासाठी झाल्या याचं उत्तर द्यावं असं राज म्हणाले.

अजित डोभालांच्या चौकशीत गैर काय?

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर सडकून टीका केली. अजित डोभालांची चौकशी केली पाहिजे या मागणीत अयोग्य काय? अजित डोभालांच्या मुलाच्या कंपनीत एक पार्टनर अरब आणि दुसरा पाकिस्तानी आहे. पुलवामा हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही, सीआरपीएफच्या जवानांना एअरलिफ्ट करण्यास आधीच सांगितलं होतं, मग हा हल्ला कसा झाला? भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काय करत होते असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरेंच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे

डोभालांच्या मुलावरुन राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

“अजित डोभाल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहित आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. कॅरेव्हान ह्या मासिकावर 1000 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारे विवेक डोभाल ह्यांचे सुपुत्र. अजित डोभालची मुलं पाकिस्तनी पार्टनर आहे, अरब पार्टनर आहे. हा पार्टनर चालतो का भाजपला? हा देशद्रोही नाही?”, असा सवाल करत राज ठाकरे यांनी अजित डोभाल यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जबाबदार नाही का? : राज ठाकरे

तसेच, “पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील जर काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का?” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.