नाशिक : “मराठी शाळा सेमी इंग्लिश करा. त्याशिवाय चालणार नाहीत. बालमोहन विद्यामंदिर शाळा सेमी इंग्लिश केली. आज 100 टक्के शाळा भरली” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मराठी शाळा बंद होतायत, त्या मुद्यावर राज ठाकरे यांनी पत्रकारांना हे उत्तर दिलं. ईडीच्या कारवाया महाराष्ट्रात होतात, त्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “अशा प्रकारच राजकारण भाजपालाही परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही. उद्या दुसरे तुमच्या अंगावर येतील, तेव्हा काय करणार? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला. “प्रत्येक निवडणूक वेगळी असते. शाश्वत ठोकताळे काही नसतात. आता यंदाच्या निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज बांधण कठीण आहे. 1995 सालच्या निवडणुका या बाबरी मशिदीचा ढाचा तुटणं, बॉम्बस्फोट या मुद्यावर झालेल्या लोकांनी त्या रागातून मतदान केलं होतं. काँग्रेसच्या मतदारांनी शिवसेना-भाजपा युतीला मतदान केलं होतं” असं राज ठाकरे म्हणाले.
“2014 ला रागातून मतदान झालं होतं. एखादी गोष्ट पूर्ण होते, तेव्हा समाधानातून किती मतदान होतं हे माहित नाही. आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली. उत्तरावर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. राम मंदिर झाल, याचा मला आनंद आहे. पण म्हणून मी काही भाजपाचा मतदार नाही” असं राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांच्या खुर्चीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, मला मको’ सत्तेतले लोक विरोधी पक्षात आले की, गटबाजी दिसून येते, असं मनसेच्या अंतर्गत गटबाजीच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “लोकांसमोर मी सांगितलेल हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा बोललेलो हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे, कायदेशीरबाबी आहेत, असा निर्णय राज्य सरकर घेऊ शकणार नाही, त्यासाठी सुप्राीम कोर्टात जाव लागेल. अनेक प्रोसेस आहेत. मला वाटत मराठा समाजातल्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे”
‘त्यांना कळलं का, काय झालं?’
“मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले. विजयोत्सव साजरा झाला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधव त्या मोर्चाला गेलेले, त्यांना कळलं का, काय झालं? विजय झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता?” असा प्रश्न राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.