मुंबईः संजय राऊतांमुळे (Sanjay Raut) ठाणे महापालिकेत आता एकच नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उरलाय. पक्षप्रमुख आता त्यालाच महापौर करणार वाटतं, असा आशयाचा खोचक शेरा मनसे नेते गजानन काळे यांनी लगावलाय. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेला (Thane Municipal corporation) आज मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे अनेक नगरसेवक शिवसेनेतून फिटतील, अशी अपेक्षा होती. मात्र एक नाही दोन नाही तर अवघी उद्धव ठाकरेंची शिवसेनाच रिती झाली. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या एकूण 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता उद्धव ठाकरेंकडे एकच नगरसेवक राहिला. या परिस्थितीवर मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर ही वेळ आल्याचं ट्वीट त्यांनी केलंय.
मनसे नेते गजानन काळे यांनी ठाणे महापालिकेतील घडामोडीवर ट्विट केलं. त्यांनी लिहिलंय…
‘चमत्कार बाबा’संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला
त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख …
सौ दाऊद,एक राऊत …
‘चमत्कार बाबा’संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला?
त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख …
सौ दाऊद,एक राऊत …?— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 7, 2022
मुंबईनंतर शिवसेनेचा मोठा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेत शिवसेनेचे एकूण 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील 66 नगरसेवकांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. यात माजी महापौक नरेश मस्के यांचाही समावेश आहे. या माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. 67 पैकी एकच नगरसेवक आता उद्धव ठाकरेंच्या गटात आहे. खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्यानंतर नागपुरातही हीच स्थिती आहे. येथील शिवसेना पदाधिकारीदेखील एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी बंडखोर आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.