ठाणे: शिवसेनेने संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) सोबत युती केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे. या युतीमुळे शिवसेनेला (shivsena) मराठा व्होटबँकेचा फायदाच होणार आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या या युतीचा सर्वच राजकीय पक्षांनी धसका घेतला आहे. त्यामुळे या युतीवर टीकाही होऊ लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरे यांनी युतीचा फुसका बार सोडल्याची खोचक टीका केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीचा काहीच फायदा होणार नसल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला करण्याची संधी साधली आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांच्यापाठोपाठ मनसे आमदार राजू पाटील (raju patil) यांनी ही जोरदार टीका केली आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील एक ट्विट करून शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर हल्ला चढवला आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…, असं खोचक ट्विट करून राजू पाटील यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर टीका केली आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटर आणि फेसबुक पोस्ट करत माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्याशी हात मिळवणी करत राज्यात नवं राजकीय समीकरण करण्याच्या प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. त्यात मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला असून हे ट्विट उद्धव ठाकरे यांना टोमणा मारण्यासाठी केलं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा केली. आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारच आहोत. पण खांद्याला खांदा मिळून निवडणूकही लढणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. संभाजी ब्रिगेडही पुरोगामी संघटना आहे. आमचं हिंदुत्वही स्पष्ट आहे. आमचं हिंदुत्व त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत आले असंही त्यांनी सांगितलं. तसेच दोन्ही संघटनांतील मतभेदावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समितीही स्थापन केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सत्तेविना मती गेली,
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022