मुंबई : शिवसेनेच्या सामना या मुखपत्रामधून भारतीय जनता पक्ष व मोदी सरकारवर जोरदार (Modi Government) टीकेचे आसूड ओढले जात असते. गुरुवारी पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून (samana editorial )आसाम सरकारच्या दाव्यावरुन भाजपला घेरले आहे. आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. त्यावर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात मिंधे सरकार आल्यापासून राज्याला पनवतीच लागली आहे. देव, धर्म आणि राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या महाराष्ट्राला हतबल करण्याचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे या सरकार विरोधात आता राज्यातील जनतेलाच शिवशंभोचा शंख फुंकावाच लागेल, असा संताप दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.
सामनाच्या या भूमिकेवर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. कारण सामनात सरकारी जाहिराती प्रसिद्ध होत असतात. आधी या जाहिराती बंद करा, मग बोला या आशयाचे ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय.
वादात मनसेची उडी
सामना दैनिकातून गुरुवारी अग्रलेखातून राज्य सरकारवर टीका केली आहे. शिंदे गटाच्या फुटीरतावाद्यांना आधी सुरत आणि नंतर आसामच्या गुवाहाटीत राजाश्रय मिळाला होता. त्यांची काय झाडी, काय हाटील… अशी बडदास्त ठेवली गेली होती. मुक्कापासून ते कामाख्या मंदिरातील विधीपर्यंतचा पाहुणचार आसाम सरकारनेच केला होता. त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकर प्रकरणी निषेधाचा नि सुद्धा निघालेला नाही, असा हल्लाही चढवण्यात आला आहे.
यावर मनसेने सामनाला घेरले आहे. सामनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यात म्हटले आहे की,
सरकारी जाहिरातीच्या पैशांवर चालणाऱ्या सामनामधून पगार घेणाऱ्यांची आमच्याबद्दल बोलायची लायकी नाही जाहिराती बंद तर पगार पण बंद “xx राहायचं ”
सरकारी जाहिरातीच्या पैशांवर चालणाऱ्या सामनामधून पगार घेणाऱ्यांची आमच्याबद्दल बोलायची लायकी नाही जाहिराती बंद तर पगार पण बंद "चड्डीत राहायचं " pic.twitter.com/OlbI43NpPf
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 16, 2023
ट्विटसोबत सरकारी जाहिरातीचे कात्रण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोडले आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गड आणि भाजपच्या वादात मनसेने उडी घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.
फडणवीस म्हणतात सामना वाचत नाही
सामनामधून सातत्याने भाजपवर टीका केली जाते. यावर अनेकवेळा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपण सामना वाचत नसल्याचे सांगत उत्तर देणे टाळले. सामनात केल्या जाणाऱ्या टीकेपेक्षा मला लोकांचे प्रश्न जास्त महत्वाचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले होते. परंतु सामनातून होणारी टीका त्यांना जिव्हारी लागत असल्याचे दिसून येते.