मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ‘घरवापसी’ निश्चित झाली आहे. उद्या दुपारी 2 वाजता आमदार शरद सोनवणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील शिवसेना भवनात सोनवणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल.
शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार होते. त्यामुळे मनसे आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कालच म्हणजे 9 मार्च रोजीच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने शरद सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि ते जिंकूनही आले होते. 2014 साली मनसेचे एकमेव आमदार ठरण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
तीन दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यक्तिशः भेट घेऊन शरद सोनवणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता केली होती.
जुन्नर स्थानिक राजकारणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कडवा संघर्ष आहे. त्यामुळे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने समर्थकांच्या मागणीनुसार निर्णय घेतल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. काल मनसेच्या वर्धापन दिनालाही शरद सोनावणे गैरहजर होते.
कोण आहेत शरद सोनवणे?