मुंबई : ‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान झाल्याप्रकरणी ‘वायकॉम 18’ ने माफी मागितली आहे. ‘वायकॉम 18’ ने याबाबतचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. पण राज ठाकरे यांना मराठीत तर उद्धव ठाकरे यांना इंग्रजीत माफीनामा पाठवण्यात आला आहे. याच कारणावरुन आता राजकारण सुरु झालं आहे (MNS poster on Colors TV apologies).
सोशल मीडियावर सध्या मनसे कार्यकर्त्यांकडून एका पोस्टरचा फोटो शेअर केला जात आहे. या पोस्टरमध्ये लिहिलेल्या वाक्यांवरुन मनसे आणि शिवसेनेमध्ये राजकीय वाद उफाळू शकतो. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’. कलर्स वाल्यांना पण माहीत आहे खरं सरकार कुठे आहे ते”, असं पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं आहे (MNS poster on Colors TV apologies).
बिग बॉस शोमध्ये एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 24 तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रिकरण बंद पाडण्याची धमकी दिली होती. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिलाय.
दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या स्पर्धकाची शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही तासांपूर्वी कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना सादर केलेला माफीनामा इंग्रजी भाषेत होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या इंग्रजी भाषेतील पत्रात अपोलॉजी (Apology) हा शब्द वापरण्यात आला आहे.
कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते, याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे वाहिनीकडून म्हटले गेले आहे.
या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने यां पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.
आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत.
मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.’(Jaan Kumar Sanu Controversy Colors TV apoloCogies)
‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.
संबंधित बातम्या :