पुणे : पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे (Pune Municipal Elections) वार वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्षसंघटनेवर बळ देताना दिसत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. तसंच येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवली जाणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांसोबत पंगतीत न बसता खुर्चीवर बसून जेवण करावं लागलं. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागसकर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनसे राज्य सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक वसंत मोरे, श्रीनिवास घाटगे हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, बुधवारी नियोजित बैठका झाल्यानंतर राज ठाकरे यांचा आज 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ, 12 ते 2 पर्वती मतदारसंघ, दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक, असा कार्यक्रम आहे. शुक्रवारी 17 डिसेंबरला आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण केलं. त्यावेळी त्यांनी तिथल्या बांधकाम कामगारांना कधीही न विसरता येणारी अशी भेट दिली. कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या बांधकामातील मजुरांसोबत भोजन केलं. याआधी प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी साफसफाई कामगारांचे पाय धुवून सन्मान केला होता.
Behind the success of the Shri Kashi Vishwanath Dham project is the hardwork of countless individuals. During today’s programme I had the opportunity to honour them and have lunch with them. My Pranams to these proud children of Bharat Mata! pic.twitter.com/iclAG9bmAR
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021
इतर बातम्या :