मुंबई : “सोयीचे प्रबोधनकार सांगू नका. त्यांची भूमिका त्या त्या काळाशी संबंधित होती, सांगायचे असतील तर पूर्ण प्रबोधनकार सांगा, नाहीतर नादी लागू नका, प्रबोधनकार तुम्हाला झेपणार नाहीत”, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला होता. आज प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील त्यांचा एक विचार सांगत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, असा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे विविध नेते राज ठाकरेंवर तुटून पडले. आज प्रबोधनकार ठाकरेंचा विचार सांगणारं ट्विट करत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर वार केला आहे.
“जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय”, असं राज ठाकरे म्हणाले.
“जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!”
: प्रबोधनकार ठाकरे
‘माझी जीवनगाथा’ (पाने २८०-२८१)— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2021
मनसे नेते अनिल शिदोरे यांनी तासाभरापूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या पुस्तकातील विचार ट्विट केला. प्रबोधनकार ठाकरे यांचा तोच विचार राज ठाकरे यांनी ट्विट केला. दोघांच्याही ट्विटमध्ये केवळ प्रबोधनकार ठाकरे यांचा पुस्तकातील विचार आहे. मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसलाच प्रत्युत्तर द्यायचं हे नक्की, त्याचं कारण शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंना दिलेला सल्ला…!
महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना खास सल्ला दिला. राज ठाकरेंवर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.
शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
(MNS Raj Thackeray Slam NCP Over Tweet on Prabodhankar thackeray)
हे ही वाचा :