VIDEO : राज ठाकरेंविरोधात व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट टाकणाऱ्याला मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. संदीप तिवारी असे या तरुणाचे नाव असून, त्याला मनसैनिकांनी मारहाण करत उठाबशाही काढायला लावल्या. नेमकी घटना काय घडली? अंबरनाथ पूर्वेकडील धारा रेसिडन्सी येथे राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर व्हॉट्सअॅप […]

VIDEO : राज ठाकरेंविरोधात व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट टाकणाऱ्याला मारहाण
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. संदीप तिवारी असे या तरुणाचे नाव असून, त्याला मनसैनिकांनी मारहाण करत उठाबशाही काढायला लावल्या.

नेमकी घटना काय घडली?

अंबरनाथ पूर्वेकडील धारा रेसिडन्सी येथे राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी संदीप तिवारी याचं घर गाठून, त्याला मारहाण केली. या मारहाणीनंतर मनसैनिकांनी संदीप तिवारीला मनसेच्या कार्यालयात आणलं आणि उठाबशा काढायला लावल्या.

याआधीही असे प्रकार!

याआधाही मनसैनिकांनी अशाप्रकारची दादागिरी केली आहे. काही दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्याचे मनसेतर्फे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त शिवाजी पार्क येथे जमावे असे लोकांना मनसेच्या फेसबुक पेजवर आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याचे राहते घर शोधले. त्यांच्या घरात जाऊन त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच  त्यांनी लिहिलेल्या पोस्टबाबत त्यांना जबरदस्ती करत माफी मागायला लावली. तसेच त्यांना उठा-बशाही काढायला लावल्या. यावर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मनसे कार्यकर्त्यांना विरोध केला. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही.

संबंधित बातमी : राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मनसैनिकांकडून मारहाण

पाहा व्हिडीओ :