यवतमाळ– ज्यांचे संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेलं, ज्यांनी जेव्हा जेव्हा सत्ता मिळवली ती तोडफोडीतून मिळवली. त्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) सर्टिफिकेटची पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi)गरज नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President)यांनी केली आहे. शरद पवार यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. अनेक राज्यांत ईडीचा गैरवापर किंवा तोडफेडीचे राजकारण करुन भाजपा सत्ता मिळवत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार यांच्या पूर्ण आयुष्याचा इतिहास बघितला तर त्यांचे संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेले आहे, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे.
स्वतःच्या भरवश्यावर त्यांना 100 आमदारही कधी निवडणून आणता आलेले नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले. शरद पवारांनी जेव्हा-जेव्हा सता मिळवली तेव्हा-तेव्हा ती तोडफोडीतून मिळवली. अशी टीकाही बावनकुळेंनी केली.
पंतप्रधान मोदींनी 8 वर्ष मध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आहे. याचे प्रमाणपत्र जनता देत आहे. शरद पवार यांच्या सर्टिफिकेटची मोदींना गरज नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे, उद्धव ठाकरेंची नाही, असे वक्तव्यही बावनकुळे यांनी केले आहे. उध्दव ठाकरे यांचा आता फक्त गट राहिला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेना हिंदुत्ववादीही आहे आणि एकनाथ शिंदेंची आहे, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले म्हणून 40 आमदार आणि 12 खासदार सोडून गेले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
गेले अडीच वर्षाचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांनी हिंदू विरोधी काम केले आहे, असे बावनकुळे म्हणाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्रात कुठे फिरण्यात अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत दौरा करावा, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.