Bajrang Sonwane : तुम्हाला पद का पाहिजे? आमचे मुडदे पाडायला, खासदाराचा थेट धनंजय मुंडेंना सवाल

| Updated on: Dec 28, 2024 | 3:31 PM

Bajrang Sonwane : "उद्योग निर्माण झाला तर तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हा उद्देश असला पाहिजे. हा उद्देश असायला हवा होता. पण इथे उलटं आहे" असं खासदार बजरंग सोनावणे म्हणाले. "विंड मिल मालकही गुंड पाळतात. ते शेतकऱ्यांना त्रास देतात, त्याचाही तपास झाला पाहिजे"

Bajrang Sonwane : तुम्हाला पद का पाहिजे? आमचे मुडदे पाडायला, खासदाराचा थेट धनंजय मुंडेंना सवाल
Mp Bajrang Sonwane
Follow us on

“आपण इथे मौजमजा करायला आलो नाही. आपला एक मावळा आपल्यातून निघून गेला. माझी एक भगिनी उघडी पडली आहे. हे कशाने झालं तर यांच्या वृत्तीमुळे झालं आहे. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. मे महिन्यातच केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विंड मिल आपल्या जिल्ह्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसा मिळेल, उद्योग निर्माण झाला तर तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हा उद्देश असला पाहिजे. हा उद्देश असायला हवा होता. पण इथे उलटं आहे” असं खासदार बजरंग सोनावणे म्हणाले. “विंड मिल मालकही गुंड पाळतात. ते शेतकऱ्यांना त्रास देतात, त्याचाही तपास झाला पाहिजे” अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली.

“संतोषचं अपहरण झाल्यापासून आपण लढतोय. पण अजूनही सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. ज्या दिवशी अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आकाचा मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहे. मुंडे साहेब मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. तुम्हाला बीडला न्याय द्यायाचा असेल या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही राजीनामा फेकून चौकशीला सामोरे जा. तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे. फक्त आम्हाला मारायला?” असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला.

‘बोगस मताची लीड’

“या जिल्ह्यातील मंत्र्यांना बोगस मताची लीड आहे. यांची ताकद का वाढली तर यांच्या मागे प्रशासन आहे. शासन आहे. या शिवाय हे दिवसाढवळ्या खून करतात” असा आरोप बजरंग सोनावणे यांनी केला.

‘मी उपोषणाला बसणार’

“संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी द्या. सीआयडी आणि एसआयटीकडे चौकशी दिली. पण ते अधिकारी कोण आहेत. वाल्मिकी कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा. 302 चा गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. तरच न्याय होईल. राजकारण नको. या नवीन वर्षात 2 तारखेपर्यंत तपास लागला नाही. अटक केली नाही. तर दिल्ली असो की महाराष्ट्र असो की बीड असो मी उपोषणाला बसणार आहे” असं बजरंग सोनावणे म्हणाले.