Worli Hit & Run : वरळी हिट अँड रन प्रकरण, अंडरवर्ल्ड कनेक्शन, संजय राऊतांचे गंभीर आरोप

| Updated on: Jul 10, 2024 | 10:42 AM

Worli Hit & Run : "मुंबई पोलिसांना आवाहन करतो, त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदेंसोबत कुठल्या पद्धतीची माणस बसलीत हे तुम्हाला समजेल" असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Worli Hit & Run : वरळी हिट अँड रन प्रकरण, अंडरवर्ल्ड कनेक्शन, संजय राऊतांचे गंभीर आरोप
संजय राऊत यांचा हल्लाबोल
Follow us on

वरळी हिट अँड रन प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. “सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. हिट अँड रनच हे साधं प्रकरण नाहीय. पुण्यात अग्रवाल फॅमिली होती, तशी ही शाह फॅमिली आहे. मुलाच्या बापाचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. वडिल शिवसेना शिंदे गटाचा नेता आहे. पोलिसांकडे रेकॉर्ड नसेल, तर आम्ही देतो. कुठल्या अंडरवर्ल्ड गँगरबरोबर संबंध आहेत. काय करतो? इतकी प्रॉपर्टी, इतक्या भारी गाड्या कुठून येतात? याचा हिशोब मुंबई पोलिसांना करावा लागेल” असं संजय राऊत म्हणाले.

“आरोपीचे वडिल मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा बनला. अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे. बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रेकॉर्ड चेक करा. मुंबई पोलिसांना आवाहन करतो, त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदेंसोबत कुठल्या पद्धतीची माणस बसलीत हे तुम्हाला समजेल” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

‘रस्त्यावर फेकून पुन्हा चिरडलं, हा खूप आमनुष प्रकार’

“आरोपी मुलगा ड्रग्सच्या नशेत होता. हा नशा रेकॉर्डवर येऊ नये म्हणून तीन दिवस फरार केलं. नंतर त्याला अटक केली. मुंबई पोलिसांवर सुद्धा यामुळे संशय येतो. एका निरपराध व्यक्तीला वारंवार चिरडलं. रस्त्यावर फेकून पुन्हा चिरडलं. हा खूप आमनुष प्रकार आहे. अशी व्यक्ती तुरुंगातून सुटू नये. कोणी सोडवायचा प्रयत्न केला, तर लोकांनी त्याला रस्त्यावर पकडून जाब विचारला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.

‘क्रॉस व्होटिंगची सर्वाधिक भिती सत्ताधाऱ्यांना’

“क्रॉस व्होटिंगची सर्वाधिक भिती सत्ताधाऱ्यांना. आम्हाला क्रॉस व्होटिंगची अजिबात भिती नाही. फडणवीसांना सत्ता यंत्रणेच्या बळावर घोडेबाजार केला. मविआचे तिन्ही उमेदवार विजयी होणार” असा दावा संजय राऊत यांनी केला.