Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांची या राज्याच्या जनतेने ठासून मारलेली आहे – संजय राऊत

| Updated on: Jun 20, 2024 | 10:27 AM

Sanjay Raut : शिवसेनेचा काल 58 वा वर्धापन दिन झाला. शिवसेनेत आता दोन गट पडलेत. त्यामुळे पक्षाचे दोन वर्धापन दिन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. आज संजय राऊत यांनी सुद्धा शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. लोकांसाठी तुम्ही काय केलं? तुमची लायकी काय? असं विचारलं.

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांची या राज्याच्या जनतेने ठासून मारलेली आहे - संजय राऊत
Eknath Shinde Sanjay Raut
Follow us on

“काल शिवसेनेचा स्थापना दिवस होता. उद्धव ठाकरे यांनी मोदींना आव्हान दिलय. हे चॅलेंज यासाठी आहे, कारण आमच्याकडून सर्व हिसकावून घेतलं, नाव, चिन्ह, आमदार, खासदार तरीही शिवसेनेने संघर्ष केला. 9 खासदार निवडून आणले. आमच्याकडे नाव, चिन्ह, असतं तर आम्ही 20 ते 22 खासदार निवडणून आणले असते” असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. “मोदींना चॅलेंज आहे, ज्यांना चिन्ह दिलय ते चिन्ह काढून घ्या. त्यांना सांगा, स्वत:च्या चिन्हावर लढा. मग, आम्ही दाखवू. तरीही महाराष्ट्र काय आहे हे आम्ही दाखवलय. 31 खासदार मोदींविरोधात लढून दिल्लीत पाठवलेत. मोदी जिथे, जिथे आले, त्या सर्व ठिकाणी पराभव झालाय” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही घासून नाही, ठासून आलोय, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “या राज्यातील जनतेने त्यांची ठासून मारली आहे. त्याला मलम लावत बसा. चोरलेलं चिन्ह, चोरलेलं नाव वापरुन निवडून येणं, याला ठासून येणं नाही, चोरुन येण म्हणतात. हे चिन्ह, पक्ष तुमचा नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह या महाराष्ट्राच्या शत्रुंच्या मदतीने तुम्ही चिन्ह, नाव चोरलं, त्याचा काही प्रमाणात फटका बसला”

‘विधानसभेला सुद्धा तुमची ठासून मारु’

“लोकांसाठी तुम्ही काय केलं? तुमची लायकी काय?. शिवसेनेची स्थापना 58 वर्षांपूर्वी झाली, तेव्हा तुम्ही कुठे होता? तुमचा जन्म झाला होता का? शिवसेनेच्या कोणत्या लढ्यात, आंदोलनात तुम्ही होता. फक्त तुम्ही टेंडर आंदोलनात होता. तुम्ही तुमच्या देवघरात मोदी, शाह आणि निवडणूक आयोगाचा फोटो ठेवून त्यांची पूजा करा. बाळासाहेबांचा फोटो वापरु नका. विधानसभेला सुद्धा तुमची ठासून मारु” असं संजय राऊत म्हणाले.