“प्रफुल पटेल, प्रताप सरनाईक, भावना गवळी आता काय म्हणतात याला अर्थ नाही. एकनाथ शिंदे, अजित पवारांपासून सगळे हे पक्ष सोडून गेले. ते ईडीपासून बचाव करण्यासाठी. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी, प्रॉपर्टी वाचवण्यासाठी. असं नसतं, तर भाजपामध्ये जाताच प्रफुल पटेल यांची इस्टेट मोकळी झाली नसती. सध्या ईडी आणि सीबीआयने फायली बंद करुन कपाटात ठेवल्या नसत्या. मग, हसन मुश्रीफ असोत, दिलीप वळसे पाटील असोत, शिवसेनेतून आमचे फुटून गेलेले लोक असतील, या सगळ्यांच पलायन ईडीला घाबरुन झालय” असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. “आता महाराष्ट्रात सराकर बदलतय, म्हणून त्यांना भिती वाटत नाही. मागच्या दोन वर्षात जे साध्य करायचय ते करुन घेतलं. मुलुंडचा पोपटलाल हा सगळ्यांना तुरुंगात टाकायला निघाला होता. आता त्याचा आवाज बंद का झाला? त्याच्या घशात काय झालय? त्याच्या घशाला बूच बसली, याचा अर्थ ईडीची कारवाई थांबवण्यात आलेली आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या तुरुंगात जाऊन आला. प्रत्येकाला एक मोकळा श्वास घ्यायचा होता. म्हणून त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता लपवाछपवी कशाला करता? काय गरज नाही. पळून गेलात, संपला विषय” असं संजय राऊत म्हणाले. “माझ्यावर दबाव होता. माझ्यावर दबाव होता ते मी तेव्हाचे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांना पत्र लिहून कळवलेलं. अनिल देशमुख, अनिल परबांवर दबाव होता. वायकर पळून गेले. वायकरवर दबाव नव्हता हे तो सांगले का? फाईल बंद झाली, बीएमसीमधील गुन्हे मागे घेण्यात आले. ईडीचा दबाव हे पक्ष फोडीच मुख्य हत्यार आहे” असं संजय राऊत म्हणाले.
म्हणून आजही स्वाभिमानाने जिवंत
ईडीतून सुटका म्हणजे पुनर्जन्म असं भुजबळ म्हणातात. त्यावर राऊत म्हणाले की, “ईडीतून सुटका म्हणजे पूनर्जन्म मानायला मी तयार नाही. आमचा पूनर्जन्मावर विश्वास नाही. पूनर्जन्म वेगैरे सगळं झूठ आहे. आम्ही मेलो नाही, आमचा जमीर जिवंत होता. आम्ही वाकलो नाही, ताठपणे उभे राहून लढत राहीलो, म्हणून आजही स्वाभिमानाने जिवंत आहोत”
मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरेंच्या विधानावर राऊत म्हणाले…
राज ठाकरे म्हणाले सत्ता द्या, 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवतो त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “हा भोंगा आम्ही 20-25 वर्ष ऐकत आहोत. त्यासाठी सत्तेची अजिबात गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी-शाहंबरोबर, तुम्ही फडणवीसांबरोबर आहात, म्हणजे सत्तेबरोबर आहात. तुमच्या हातात सत्ता येईल, नाही येईल हा पुढचा प्रश्न आहे. पक्षाच्या कार्यक्रमाला सत्तेची गरज नसते. शिवसेनेने मागची 50-55 वर्ष सत्तेशिवाय अनेक कार्यक्रम राबवले” असं संजय राऊत म्हणाले.
शिवाजी पार्कच्या मैदानाबद्दल काय म्हणाले?
17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच मैदान मिळावं, यासाठी शिवसेना आग्रही आहे. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. मनसेला सुद्धा 17 तारखेला मैदान हवं आहे. संघर्ष होऊ शकतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. त्यावर राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली, ती प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन असल्याने लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतील. उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळायला पाहिजे. पण एकदिवस आधी अर्ज दुसऱ्या पक्षाने केल्याने त्यांना ती जागा मिळतेय. दिवसभर तिथे बाळासाहेबांच्या चाहत्यांचा राबता असेल. बाळासाहेबांच्या भक्तांना अडवलं, तर संघर्ष होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वेळीच पावलं उचलणं गरजेच आहे”