Modi Govt 3.0 : मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लिम मंत्री नाही, त्यावर ठाकरे गटाचा सवाल

| Updated on: Jun 11, 2024 | 10:52 AM

Modi Govt 3.0 : "आत्मा कोणाचाच पाठलाग सोडत नाही, जो पर्यंत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरुन खाली उतरवत नाही, तो पर्यंत आमचे आत्मे शांत होणार नाहीत. आधी मोदींनी दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल"

Modi Govt 3.0 : मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लिम मंत्री नाही, त्यावर ठाकरे गटाचा सवाल
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

“महाराष्ट्र किंवा केंद्राच सरकार आहे. खासकरुन शरद पवार भटकती आत्मा आहे असं बोलल जात होतं. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होतं. या केंद्र सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे अतृप्त आत्मा आहेत. त्यांच समाधान करा. आत्मा कोणाचाच पाठलाग सोडत नाही, जो पर्यंत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरुन खाली उतरवत नाही, तो पर्यंत आमचे आत्मे शांत होणार नाहीत. आधी मोदींनी दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागेल. ज्या प्रकारे मंत्रिमंडळ खातेवापटप झालय, त्यावरुन असं वाटतय सगळेच आत्मे अतृप्त आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

“महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तिघे मिळून निवडणूक लढू. मजबूत राहू. मजबुती काय असते हे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं. त्यापेक्षा मजबुतीने विधानसभा लढू” असं संजय राऊत म्हणाले. “आता आम्ही मोदींना विचारणार नाही. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार. त्यांच्या मदतीशिवाय मोदी पंतप्रधान बनले नसते. नरेंद्र मोदींची सत्ती ही उधारीची सत्ता आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांची मेहरबानी आहे, तो पर्यंत हे सरकार टिकेल” असं संजय राऊत म्हणालेत.

मुस्लिम व्यक्तीला मंत्रीपद का नाही?

मोदींच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाही, यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलं. “मोदींना देशात हिंदू-मुस्लिम करायच आहे. मोदींना वाटतं देशातील मुस्लिमांनी त्यांना मत दिलं नाही. म्हणून त्यांना मंत्री बनवलं नाही. हे सरकार संविधानाविरोधात जात-धर्म या आधारावर काम करेल. पंतप्रधान सर्वांचा असतो, कुठल्या जाती-धर्माचा नसतो. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंना विचारणार, तुम्हाला हे मान्य आहे का?. नरेंद्र मोदी यांनी कुठल्या मुस्लीमाला मंत्रीपद दिलं नसेल, मग नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या कोट्यातून मंत्री का नाही बनवलं? ते सुद्धा भाजपाच्या दबावात आले का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.