Sanjay Raut : ‘त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही…’, संजय राऊत कुठल्या काँग्रेस नेत्याबद्दल बोलले?

| Updated on: Apr 29, 2024 | 10:43 AM

Sanjay Raut : "गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. ही धूळफेक आहे"

Sanjay Raut : त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही..., संजय राऊत कुठल्या काँग्रेस नेत्याबद्दल बोलले?
sanjay raut
Follow us on

“मोदींना माझा सवाल आहे, त्यांनी हसन मुश्रीफांवर कारवाई करावी. त्यांनी जे आमचे 12 लोक घेतले आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. मोदींची भ्रष्टाचाराविरुद्धची ही जी बोंब आहे, ती बोंब नसून पोकळ बांग आहे. या देशातले सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढतायत” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 2019 च्या शपथविधीबद्दल अजित पवार बोललेत, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार त्याच विषयावर किती वेळ बोलणार? गुळगुळीत झालय. अजित पवार यांची धमकी बहाद्दर म्हणून ख्याती आहे” “रोज सकाळी उठून मतदारसंघातील 10 लोकांना धमक्या देतात. अशी वैचारिक विधान तुम्हाला शोभत नाही” असं संजय राऊत अजित पवारांबद्दल बोलले.

नाशिक, दिंडोरी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “सरकारची घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक, खोटारडेपणा आहे. गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. ही धूळफेक आहे”

नसीम खान यांच्या उमेदवारीबद्दल काय म्हणाले?

नसीम खान यांच्या उमेदवारीबद्दलही संजय राऊत यांनी भाष्य केलं. “नसीम खान मुंबई काँग्रेसचे मोठे नेते आहेत. आमच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना निवडणूक लढवायची होती. माझ्यासोबत, उद्धवजींसोबत त्यांचं बोलण झालं होतं. त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही बोललो नाही. हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. काँग्रेकडे ज्या जागा आहेत, तो त्यांचा निर्णय आहे. अजूनही काँग्रेसला वाटत असेल, उमेदवार बदलून नसीम खान यांना उमेदवारी द्यावी तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही मविआ धर्माच पालन करु. त्यांना निवडून आणू. नसीम खान यांना उमेदवारी नाकारण्याशी आमचा काहीही संबंध नाही”