एन्टॉप हिल (Antop Hill) , वॉर्ड क्रमांक 175! 2017 साली शिवसेनेने 6096 मिळवून जिंकलेला हा गड! यंदाच्या महानगपालिका तोंडावर असतानाच राज्यात बराच मोठा राजकीय बदल झालेला दिसून येतोय. हा बदल महानगरपालिकेत काय चमत्कार घडवून आणतो हे उत्सुकतेचं ठरणारे. मुळातच मुंबईत शिवसेनेचे (Shivsena) चांगली छाप आहे. अनेक वॉर्डांप्रमाणे इथे सुद्धा मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिलीये. परंतु आता शिवसेनेतच उभी फूट पडलीये त्यामुळे इतर काही वॉर्डांप्रमाणेच या वॉर्डात शिवसेनेचं काय होणार आणि इतर पक्ष त्याचा फायदा घेऊ शकणार का हा हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. या वॉर्डात गेल्या निवडणुकीत (Election) एकूण मतदार 30860 होते. त्यातली वैध मतांची संख्या 17599 इतकी होती.
वॉर्ड 175 एन्टॉप हिल या वॉर्डात CGHS कॉलनी एन्टॉप हिल, SM रोड या ठिकाणांचा समावेश होतो.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | सातमकर मंगेश श्रीधर | सातमकर मंगेश श्रीधर |
भाजप | लोरिक रामचेत यादव | - |
राष्ट्रवादी काँग्रेस | गुप्ता योगेश संजय | - |
काँग्रेस | ललिता कचरु यादव | - |
मनसे | - | - |
अपक्ष / इतर | कांबळे वर्षा विजय | - |
२०१७ च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड १७५ एन्टॉप हिल या वॉर्डात मतदारांनी शिवसेनेला जिंकून दिलं होतं. या निवडणुकीत नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी या पक्षांचे प्रत्येकी एक उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. सगळ्यात कमी मतं अपक्ष कांबळे वर्षा विजय यांना होती. सगळ्यात जास्त मतांचा आकडा 6096 इतका होता जो शिवसेनेने मिळवलेला होता त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ललिता कचरु यादव यांना 5619 इतकी मतं मिळाली होती.