मुंबई: शिवसेनेच्या (shivsena) आक्रमक आणि अभ्यासू नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे (sheetal mhatre) या तिसऱ्यांदा महापालिकेच्या रणमैदानात उतरणार आहेत. सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या शीतल म्हात्रे यांचा मतदारसंघ हा खुला झाला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी आहे. तिसऱ्यांदा विजयी होऊन शीतल म्हात्रे या विजयाची हॅट्रीक साधतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये शिवसेनेचं संघटन मजबूत आहे. शिवाय शीतल म्हात्रे यांनी या वॉर्डात प्रचंड कामं केली आहेत. वॉटर, मीटर, गटरपासून ते रस्ते आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगलं काम केलं आहे. शिवाय त्या उक्तृष्ट वक्ता आहेत. महापालिकेतील (BMC) धडाडीच्या आणि कर्तबगार नगरसेविका आहेत. त्याचा परिणामही या निवडणुकीत होण्याची शक्यता आहेच. मात्र, त्यांच्यासमोर भाजप कोण उमेदवार देणार यावरही बरंच काही अवलंबून आहे. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे.
महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | शीतल म्हात्रे | शीतल म्हात्रे |
भाजप | योगिता पाटील | - |
राष्ट्रवादी काँग्रेस | तृप्ती येरूणकर | - |
काँग्रेस | बॉबी वर्गिस | - |
मनसे | पूजा भोईर | - |
अपक्ष / इतर | रमा चव्हाण | - |
2017च्या महापालिका निवडणुकीत शीतल म्हात्रे या विजयी झाल्या. पण त्यांच्यासाठी हा विजय तसा सोपा नव्हता. त्यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली होती. भाजपच्या उमेदवार योगिता पाटील यांनी चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे म्हात्रे यांचा अवघ्या 520 मतांनी विजय झाला होता. यावरून ही लढत किती अटीतटीची झाली होती हे दिसून येतं.
या निवडणुकीचं वैशिष्ट्ये म्हणजे या निवडणुकीत सहा उमेदवार उभे होते. सर्व सहाजण पक्षाचे उमेदवार होते. एकही अपक्ष उमेदवार उभा राहिला नव्हता. बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादीला चार अंकी आकडाही गाठता आला नव्हता.
या वॉर्डात एकूण 34,873 मतदार आहेत. त्यापैकी 20,942 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 13,931 मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेही नाहीत. या मतदारसंघाची लोकसंख्या 49731 एवढी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीची संख्या 2647 इतकी असून अनुसूचित जमातीची संख्या 453 एवढी आहे.
वॉर्ड क्रमांक 7 मते दहिसर नदी, श्री दिगंबर जैन मंदिर, नवा गाव, कांदर पाडा, सुधीर फडके उड्डाणपूल, रामकुवर ठाकूर मार्ग, एस. व्ही. रोड, मराठा कॉलनी, सुकरवाडी, दौलत नगर आदी नगरांचा समावेश होतो.