मुंबई: अडीच वर्षानंतर राज्यात चांगलाच राजकीय धुमाकूळ झालाय. सगळीच राजकीय गणितं बदलली आहेत. लाल बहादूर शास्त्री नगर
हा वॉर्ड क्रमांक 89! या वॉर्डात 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार विजयी झाला होता. दिनेश काशिराम कुबल यांनी 8682 मतं मिळवत इतर पक्षाच्या उमेदवारांना मागे टाकत 2017 साली विजय मिळवला होता त्यामुळे लाल बहादूर शास्त्री नगर (Lalbahadur Shastri Nagar) हा वॉर्ड शिवसेनेचा किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकांची मतं ही अपक्ष उमेदवार एल.सी. पूजारी यांना मिळाली होती. या वॉर्डाच्या 2017 च्या निवडणुकीत (2017 Election) पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारांच्या आपसातील मतांमध्ये फारसा फरक नसल्याचं पाहायला मिळतं.
लालबहादूर शास्त्री नगर, गाला कॉलेज आणि धोबी घाट या ठिकाणांचा वॉर्ड क्रमांक 89 मध्ये समावेश होतो.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | दिनेश काशिराम कुबल | दिनेश काशिराम कुबल |
भाजप | दिलीप स. पाटील | - |
राष्ट्रवादी काँग्रेस | - | - |
काँग्रेस | ठाकूर सूर्यवंश बालरूप | - |
मनसे | उप्रलकर संतोष मोहन | - |
अपक्ष / इतर | एल.सी. पूजारी | - |
एकूण वैध मते – 27853
शिवसेना – 8682
अपक्ष – 8031
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 3654
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 3645
भारतीय जनता पार्टी – 3473
जर आपण 2017 च्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला दिसून येतं की शिवसेनेचा विजयी उमेदवार आणि अपक्ष असलेला दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक नाही. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारांच्या मिळालेल्या मतांत सुद्धा फारसा फरक नाही. पहिल्या पाच मध्ये विजयी शिवसेना, त्यानंतर अनुक्रमे अपक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस आणि भाजप आहेत. 2017 साली एकूण वैध मतं 27,853 असल्याचं पाहायला मिळतं.