मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे (Loudspeaker in Mosques) काढले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधील लाऊडस्पीकर लावण्यास बंद घालण्यात आली आहे. तशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. इतकंच नाही तर सायलेन्स झोनमधील धार्मिक स्थळांना तर पूर्णपणे लाऊडस्पीकर बंदी घालण्यात आली आहे. परवानगी न घेता अनधिकृतपणे लाऊडस्पीकर लावणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्याचे डेसिबल मोजण्याचे आदेश दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीमकडून भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी त्यांनी डेसिबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आलं. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सय्यद पिंप्री गावात मशिदीत नमाज सुरु झाल्यानंतर भोंग्याचं डेसिबलही मोजण्यात आलं.
येत्या 3 मे रोजी मनसेकडून राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा करण्यात येणार आहे. 3 मे रोजी ईद असली तरी त्याच दिवशी अक्षय तृत्तीयाही आहे. त्यामुळे त्या दिवशी राज्यात महाआरती आणि हनुमान चालिसाचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे
इतर बातम्या :